साने गुरुजी म्हणजे जीवन घडविण्याची मायेची सावली : डॉ. अशोक पारधे यांचं प्रतिपादन*
1 min read

साने गुरुजी म्हणजे जीवन घडविण्याची मायेची सावली : डॉ. अशोक पारधे यांचं प्रतिपादन*

Loading

*साने गुरुजी म्हणजे जीवन घडविण्याची मायेची सावली : डॉ. अशोक पारधे यांचं प्रतिपादन*

 

जळगाव :- आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी संस्कारक्षम कथामाला उपक्रमा अंतर्गत कवी, साहित्यिक डॉ. अशोक पारधे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम झाला. यात डॉ. पारधे यांनी
साने गुरुजी ही संस्काराची, जीवन घडविण्याची मायेची सावली असून त्या माऊलीच्या कथांनीविद्यार्थी जीवनाला संस्कारकक्षम घडविले असल्याचे डॉ. पारधे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी इ. नववी ‘ब’ ची विद्यार्थीनी मोहिनी पाटील होती. या वेळी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल. पर्यवेक्षक एल. जे. पाटील उपस्थित होते. हर्षाली पाटील, वैष्णवी मोरे या विध्यार्थिनी अति तिथं माती, शारीरिक स्वच्छता, मनाची स्वछता ही गरजेचं आहे. डॉ. पारधे यांनी कथाकथनातून साने गुरुजी यांच्या छान छान व संस्कारकक्षम गोष्टी सांगितल्या. प्राणी मात्रावर दया करा, जिद्द, चिकाटी, मेहनत अंगीकरा यातूनच यश प्राप्ती होऊ शकते. असा संदेश दिला. भावना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. अनिता पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *