शिक्षकेतर संघटना नंदुरबार यांच्याकडून शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन
![]()
शिक्षकेतर संघटना नंदुरबार यांच्याकडून शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन
नंदुरबार जिल्हा – आमदार किशोरभाऊ दराडे यांनी आयोजित केलेल्या जिल्हा शिक्षक शिक्षकेतर दरबारात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदनाद्वारे मागणी केली त्यात एकूण १८मागण्या असून प्रामुख्याने ३१ डिसेंबर २०23 पर्यंत अखेर 24 वर्षाची वेतनश्रेणी १० २० ३० एक्स्थर वेतन श्रेणी आदी मागण्याचे निवेदन नाशिक विभागीय कार्यवाह डी पी महाले राज्य शिक्षकेतर संघटना महामंडळ नाशिक विभाग याच्या कडून देण्यात आले त्यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे नेते संभाजी पाटील सर शिक्षणाधिकारी वंदना वळवी मॅडम नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पराज रघुवंशी उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण वेतन अधीक्षक प्रमोद पाटील लेखाधिकारी प्रवीण देवरे सर उच्च माध्यमिक संघटनेचे प्रा एस एन पाटील प्रा निशिकांत शिंपी नंदुरबार जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेचे लोकनियुक्त सचिव जयेश वाणी ठाकरे भाऊसाहेब पाडवी भाऊसाहेब जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे माजी कार्यवाह इसरार सय्येद जुबेर सर आमदार किशोर दराडे याचे पी ए हरीश मुडे सर डी पी महाले नाशिक विभागीय कार्यवाह राज्य शिक्षकेतर संघटना महामंडळ नाशिक सह उपस्थित होते


