हरीश संघवी यांना शासनाचा ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार व प्राचार्य डॉ.संभाजी सगरे ” गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित.  *श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्य हे विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी आहे,: डॉ.मनिलाल शिंपी*
1 min read

हरीश संघवी यांना शासनाचा ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार व प्राचार्य डॉ.संभाजी सगरे ” गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित. *श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्य हे विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी आहे,: डॉ.मनिलाल शिंपी*

Loading

श्री हरीश संघवी यांना शासनाचा ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार व प्राचार्य डॉ.संभाजी सगरे ” गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित.

*श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्य हे विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी आहे,: डॉ.मनिलाल शिंपी*

नाशिक( प्रतिनिधी)महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण २०१६ अन्यन्वे स्थापित महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समितीद्वारे श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष मा.श्री. हरीश संघवी यांना ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार बहाल करण्यात आला. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर पॉलिटेक्निक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समिती नाशिकचे विभागीय अध्यक्ष डॉ. मणिलाल शिंपी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संभाजी सगरे यांनाही ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

“सदर पुरस्कार आपणाला देताना आम्हाला सार्थ अभिमान होत असून, श्री.महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्य सर्वसामान्य साधारण परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी खूप मोलाचे आहे. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून बुद्धिमत्ता वाढीसाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. आपल्या या निरंतर कार्याला आणि त्याच प्रमाणे यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. आपल्या विचारधारांना अन् कर्तव्यांना आमचा मानाचा मुजरा आहे असे यावेळी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे पालघर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी म्हणाले, आपले कार्य हे प्रेरणादायी असून ते अविरत चालु राहावे, प्रत्येकासाठी हे मानबिंदू ठरावे असे आहे असेही ते यावेळी सन्मानचिन्ह देतांना म्हणाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका डॉ. प्रियंका झंवर, विभागप्रमुख प्रा. अनुप सोनवणे, मयूर गायधनी, सतीश देवरे, पूजा भालेराव, प्रा. संजय भामरे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे वव विद्यार्थी, पालक आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे कार्यवाहक व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, चंद्र आनंद कृषी उत्पादन संस्थेचे अध्यक्ष,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे साहेब, रोटरी क्लब मिटवून चे मा.सचिव, मोटिवेशनल स्पीकर उद्योजक डॉ. किशोर अढळकर सर, समाजसेवक उद्योजक डॉक्टर रामचंद्र देसले, समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ. सोन्या भाऊ पाटील यांच्याकडूनही श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री हरी संघवी साहेब, व प्राचार्य डॉ. संभाजीराव सगळे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *