“शिक्षणातील छाप: मोहिनी खलाणे हिचे सुवर्णपदकाने गाजवलेले यश!” मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव
![]()
“शिक्षणातील छाप: मोहिनी खलाणे हिचे सुवर्णपदकाने गाजवलेले यश!”
मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- धुळे येथील महानगरपालिका विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक संजय खलाणे सर यांची मुलगी मोहिनी संजय खलाणे हिला कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव येथे BSc मध्ये सर्व विषयातून प्रथम क्रमांक प्राप्त करण्यात यश मिळाले. तिने Zoology या विषयातून देखील प्रथम क्रमांक मिळवून दोन सुवर्ण पदके प्राप्त केली.
तिने आपल्या मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत M.Sc. मध्ये सर्व विषयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या यशाची नुकतीच दखल घेण्यात आली असून मोहिनी संजय खलाणे हिला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे M.Sc. मध्ये सर्व विषयातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष गौरव मिळाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे “ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलारमामा सुवर्णपदक” साठी तिची निवड करण्यात आली आहे. तिला या पदकाची प्राप्ती संबंधित पत्र नुकतेच मिळाले असून, सदर पदक पदवीप्रदान सभारंभातील कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल.
मोहिनी खलाणे हिला अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील, राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव काशिनाथ माळी सर,तसेच ओबीसी शिक्षक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि तिच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

