“कलाक्षेत्रातील दिग्गज: मनोहर महाजन यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार’!”
![]()
“कलाक्षेत्रातील दिग्गज: मनोहर महाजन यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार’!”
अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील लोकमान्य विद्यालयाचे कलाशिक्षक आणि क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष श्री. मनोहर भगवान महाजन यांना “राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२५” मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात आले..
दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर, जि. सोलापूर येथे आयोजित “राज्य स्तरीय अधिवेशन (कलाशिक्षण परिषद)” मध्ये हा मानाचा पुरस्कार मा. श्री. दतात्रय सावंत (मा. शिक्षक आमदार) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कलाक्षेत्रातील तसेच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याच्या कारणास्तव महाजन सरांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे अनेक सहकारी, विद्यार्थ्यांनी आणि समाजातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
सर्वत्र त्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जात असून,मनोहर महाजन सरांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

