सुरांच्या मेळ्यातील अद्भुत प्रदर्शन: जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा
1 min read

सुरांच्या मेळ्यातील अद्भुत प्रदर्शन: जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा

Loading

सुरांच्या मेळ्यातील अद्भुत प्रदर्शन: जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा

जळगांव प्रतिनिधी
खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी *जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा* आयोजित करण्यात आली.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यातील *स्वरगंधर्वाचा* शोध घेत मागील चार वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री.शशिकांत वडोदकर ( प्रशासकीय अधिकारी व के.सी.ई. सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक)
व मा.श्री शिरीषभाई गुजराथी (संगीत विशारद व समन्वयक ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे ) ,श्री.देवेंद्र गुरव (संगीत दिग्दर्शक ) व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे,सौ.धनश्री फालक ,श्री.नरेंद्र पालवे (पर्यवेक्षक) यांच्याहस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

सदरील स्पर्धेत जिल्ह्य़ातील ३७ शिक्षकांनी सहभाग नोंदवून भावगीत, भक्तीगीत, देशभक्तीपर गीत,गवळण, गझल, हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

*स्पर्धेचा निकाल*
स्पर्धेत प्रथम क्रमांक
श्री.महेंद्र अरुण साळुंखे
द्वितीय क्रमांक
सौ.राधिका सचिन करोडपती
तृतीय क्रमांक
श्री.गणेश भगवंत देशमुख
उत्तेजनार्थ श्री.प्रविण गांधिले, व श्री.जफर अकबर शेख यांनी पटकाविला.
सर्व विजेत्या स्पर्धकांना श्रीमती. उषा दिनकर वडोदकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक देण्यात आले.
*पारितोषिक वितरण*
मा.श्री.नितीन भास्कर
( चित्रपट निर्माते व दिग्दर्शक)
मा.श्री.शरद पाटील
(चित्रपट निर्माते व दिग्दर्शक)
मा.प्राचार्य. अशोक राणे
(शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव) मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास सूत्र संचालन श्री.पराग राणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती.प्रणिता झांबरे यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *