सन्मानाची परंपरा: हळदी कुंकू कार्यक्रमाने दिला उत्साहाचा संदेश  विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम
1 min read

सन्मानाची परंपरा: हळदी कुंकू कार्यक्रमाने दिला उत्साहाचा संदेश विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम

Loading

सन्मानाची परंपरा: हळदी कुंकू कार्यक्रमाने दिला उत्साहाचा संदेश

विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
२ फेब्रुवारी रोजी अमळनेर विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहाने आणि आनंदाने संपन्न झाला. यावेळी महिलाओंनी जुन्या रूढी परंपरांना महत्त्व देताना समाजातील विधवा महिलांना सामावून घेत त्यांचा विशेष सन्मान केला. कार्यक्रमादरम्यान, सर्व उपस्थित महिलांना ‘वाण’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात सौ ताईसो जयश्री अनिल पाटिल, जळगाव जिल्हा परिषद सदस्या, आणि सौ ताईसो गायत्री दिपक पाटिल, नगरसेविका यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय, लोक न्युजचे मुख्य संपादक शसंभाजी देवरे यांना मंडळाकडून पुष्पगूच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला मंडळाने ठिपक्यांची रांगोळी, सासू-सून हेअर स्ट्रॉ, बिस्कीट खाणे, फॅशन शो, बकेट बॉल, उखाणे स्पर्धा यांसारखे विविध खेळ आणि स्पर्धांचा आनंद घेतला. या स्पर्धांमध्ये सर्व महिलांनी आनंदाने सहभाग नोंदवला.
महिला मंडळाच्या प्रमुख सौ जान्हवी विकास बोरसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, ज्यामध्ये विधवा महिलांचे सामाजिक सन्मान वाढवण्याच्या उद्देशाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. आदल्या दिवशी, १ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या ठिपक्यांची रांगोळी स्पर्धेत ७० वर्षांपर्यंतच्या वृद्ध महिलांनी देखील सहभाग घेतला. यामुळे जुना ठिपका रांगोळी कलेचा सजीव अनुभव मिळाला.
रांगोळी स्पर्धेचे परीक्षक श्री वसंत सूर्यवंशी आणि श्री ज्ञानेश्वर मोरे यांनी निकाल जाहीर केले, ज्यात मोठ्या गटात कल्पना दिलीप जाधव प्रथम, शैला मोहन खैरनार द्वितीय आणि भारती अशोक खैरनार तृतीय आले. लहान गटात राजनंदिनी हर्षल देवरे प्रथम, धनश्री योगेश खैरनार द्वितीय, आणि भारती प्रमोद बाविस्कर तृतीय ठरल्या.
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे मंडळाकडून बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. यामुळे वृद्ध महिलांचा सन्मान आणि मनोबल वाढवण्यात मदत झाली. अमळनेर विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित समाजाच्या सशक्तीकरणाचा संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *