उपक्रमशील क्रीडाशिक्षक उस्मान खाटीक सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सन्मान
1 min read

उपक्रमशील क्रीडाशिक्षक उस्मान खाटीक सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सन्मान

Loading

उपक्रमशील क्रीडाशिक्षक उस्मान खाटीक सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सन्मान

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील पाडसे ता.अमळनेर येथील उपक्रमशील आणि क्रीडा शिक्षक, उस्मान सुभान खाटीक, आज 31 जानेवारी रोजी 32 वर्षांच्या समर्पित शिक्षकी सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि समाजिक बांधिलकीला महत्त्व दिले.
उस्मान खाटीक हे श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय भरवस ता. अमळनेर येथे 1993 मध्ये रूजू होऊन14 वर्षे त्यांनी सेवा केली. नंतर त्यांची सेवा जी ई एस हायस्कूल शिरसमणी तालुका पारोळा येथे 18 वर्ष सेवा करत 31 जानेवारीला ते सेवानिवृत्त झाले..शाळेतील मुख्याध्यापक मा.जितेंद्र पाटील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सेवापूर्ती सन्मान केला.
उस्मान खाटीक हे ग्रामीण भागातून येऊन आपल्या शिक्षणाची सुरुवात केली आणि प्रताप कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यांचे वडील दादासाहेब सुभान सांडू खाटीक पाडसे गावातील माजी सरपंच होते, आणि कुटुंबातील सहा भावांची यशोगाथा आज त्यांच्या शिक्षणात आणि कार्यात स्पष्ट दिसते.

खाटीक सरांचा एक मुलगा आयआयटी पूर्ण करून नाशिक येथे ईपीएफओ खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहे, सुनबाई आर.सी पटेल महाविद्यालयात प्राध्यापिका आहे, आणि दोन्ही मुली वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत आहेत. त्यांच्या पत्नीने डीएमएलटी मधून पदवी मिळवली आहे.
खाटीक सरांनी दहावीतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना गौरवण्यासाठी सन्मानचिन्हे देऊन शैक्षणिक क्षेत्रात मान वाढवला आहे. त्यांनी शाळेतील शिक्षकाशी संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले, आणि त्यांच्या विदयार्थ्यांच्या यशासाठी शिक्षणाचे रात्रीचे क्लासेस आयोजित केले.
आर्थिक, सामाजिक, आणि क्रीडा क्षेत्रातील यशामुळे खाटीक सरांना ‘आदर्श गुरुजन पुरस्कार’ मिळाला आहे. 2024 मध्ये जळगाव जिल्ह्यात 23 खेळाडूंना मैदानी व सांघिक खेळात पाठविल्यानंतर, त्यांच्या मेहनतीने क्रीडाक्षेत्रातही एक स्थान निर्माण केले आहे.
खाटीक सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मित्रमंडळींनी त्यांचा उत्साहाने सत्कार केला. त्यांच्या कार्याची गूढता व शैक्षणिक दृष्टिकोन भविष्यातील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायक ठेवेल, हे निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *