साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व संचालक मंडळाचा सभासद हिताचा निर्णय  सदस्यांच्या हितासाठी महत्त्वाची घोषणा: व्याजदर कमी, कर्ज मर्यादा वाढवली- अध्यक्ष सुशील भदाने यांची माहिती
1 min read

साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व संचालक मंडळाचा सभासद हिताचा निर्णय सदस्यांच्या हितासाठी महत्त्वाची घोषणा: व्याजदर कमी, कर्ज मर्यादा वाढवली- अध्यक्ष सुशील भदाने यांची माहिती

Loading

साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व संचालक मंडळाचा सभासद हिताचा निर्णय

सदस्यांच्या हितासाठी महत्त्वाची घोषणा: व्याजदर कमी, कर्ज मर्यादा वाढवली- अध्यक्ष सुशील भदाने यांची माहिती

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पूज्य सानेगुरूजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्था ने आपल्या सभासदांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
जामिनकी व्याजदर अर्धा टक्का कमी करून 7.50% केला आहे. कर्ज मर्यादा एक लाख वाढवून ₹700,000 केली आहे.- विशेष व्याजदरही कमी केला आहे, आता 9%आहे.
– विशेष कर्ज मर्यादा एक लाख वाढवून ₹600,000 करण्यात आली आहे.
हे निर्णय सभासदांचे हित लक्षात घेऊन घेतले आहेत आणि याबद्दल आपली मोलाची साथ आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो असे साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सुशील भदाणे यांनी सांगितले.
अतिरिक्त, आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून काही उपयुक्त योजना राबवल्या जातात:

1. कन्यादान योजना – सभासदांच्या कन्येच्या विवाहप्रसंगासाठी ₹5000 ची भेट.
2. सभागृह व रुम – सभासदांना कोणत्याही कार्यक्रमासाठी निम्मे दरात उपलब्ध.
3. सभासद गुणवंत पाल्य बक्षीस योजना
4. कर्ज घेतेवेळी आर टी जी एस – बिना शुल्क, पैसे त्वरित खात्यात जमा!
अशा अनेक सभासद हिताच्या योजनांमुळे आपली सहकार्य पतसंस्था आपल्याला विविध सुविधा देते. आम्हाला आपली साथ मिळत आहे, त्याबद्दल पुनश्च धन्यवाद!
तरी आपण सर्वांनी सभासद वाढीसाठी प्रयत्न करूया आणि आपल्या हक्काच्या पतसंस्थेचा विकास करूया! असे सुशिल धनंजय भदाणे
अध्यक्ष पूज्य सानेगुरूजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरवर्गाची पतसंस्था उपाध्यक्ष, मानद सचिव, खजिनदार व सन्माननीय संचालक मंडळ मा व्यवस्थापक व सर्व कर्मचारीवृंद
पूज्य सानेगुरूजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरवर्गाची पतसंस्था यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *