आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा ऑक्टोबर 2024 पासूनचा थकीत मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार-रामकृष्ण पाटील
1 min read

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा ऑक्टोबर 2024 पासूनचा थकीत मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार-रामकृष्ण पाटील

Loading

*आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटना*
*आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा ऑक्टोबर 2024 पासूनचा थकीत मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार*
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना ऑक्टोबर 2024 पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाचा मोबदला अदा केला नाही म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. थकित मोबदला तातडीने अदा करावा.
आभा कार्ड,गोल्डन कार्ड काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये आणि Uwin ऑनलाईन कामाचीही सक्ती करण्यात येऊ नये.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा मोबदला PFMS प्रणाली द्वारे अदा करण्यात यावा.
दरमहा पाच तारखेपर्यंत कामाचा मोबदला अदा करावा.
ऑक्टोबर 2024 पासून कामाचा थकित मोबदला आणि इतर मागण्या येत्या आठ दिवसांत अदा न केल्यास जिल्हयातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक जिल्हा परिषदेवर तीव्र आंदोलन करतील असा इशारा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी दिला आहे.
तसेच आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास संघटनेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात असे ही आवाहन रामकृष्ण बी.पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *