अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक
![]()
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक
अमळनेर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची जळगाव जिल्हा आढावा बैठक झाली. अध्यक्ष आमदार नरेंद्रभाई अण्णासाहेब पाटील यांनी आढावा घेतला.
यावेळी मराठा महासंघाच्या प्रतिनिधी म्हणून माथाडी कामगार नेते भगवानराव पाटील व विक्रांत भास्करराव पाटील यांनी स्वागत केले. बैठकीत जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी सोबत चर्चेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहभागी झाले. यात मराठा समाजातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देणे बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी करण्यात अडचणी आणू नयेत, अश्याही सूचना नरेंद्र पाटील यांच्या कडून करण्यात आल्या. राज्यातील व जिल्ह्यातील सहकारी बँक चांगले सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

