डी.आर कन्या शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न
![]()
डी आर कन्या शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर दिनांक 1 फेब्रुवारी येथील येथील डी.आर.कन्या शाळेत शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. हिवाळी स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही.एम. पाटील यांनी केले.त्यावेळी खो-खो,कबड्डी, नींबू चमचा, गोणपाटउडी,स्लो सायकलींग, रनिंग, आट्यापाट्या अशा विविध खेळांचा त्यात समावेश होता. शाळेच्या पाचशेच्या वर विद्यार्थिनींनी सदर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक व शिक्षिकांनी सहभागी होऊन विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविले. बक्षीस पात्र विद्यार्थी व शिक्षकांचे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षिका एस.पी. बाविस्कर,जेष्ठ कलाशिक्षक एस.एस.माळी उपस्थित होते. शालेय क्रीडा स्पर्धेचे संचालन क्रीडा शिक्षक के. आर.बाविस्कर यांनी केले. हिवाळी क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी सहकार्य केले.


