मुंगसे शाळेत भरपूर आनंद: 2025 बालआनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन!
![]()
मुंगसे शाळेत भरपूर आनंद: 2025 बालआनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जि.प. प्राथमिक शाळा, मुंगसे, ता. अमळनेर येथे 2025 बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उदघाटन डॉ. श्री. भावेश पाटिल आणि चंदनाई बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य श्री. सिद्धार्थ पाटिल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सरपंच सौ. शोभाताई निलेश कोळी यांची विशेष उपस्थिती होती.
मेळाव्यात मुला-मुलींना विविध प्रकारचे खाद्य पदार्थ ऑफर करणारे 28 टेबल्स लावण्यात आले होते. श्री. अशोक इसे सर यांनी सुञसचंलन केले, तर प्रास्ताविक श्री. जगदिश चौधरी यांनी केले. कार्यक्रमास गावातील ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ पत्रकार, अंगवाडी सेविका, विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
बालकांनी 3000 रुपयांचे खाद्यपदार्थ विक्री करून शाळेला 2185 रुपयांची देणगी दिली, जे शिक्षण आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामपंचायत सदस्य श्री. निलेश कोळी यांनी कार्यक्रमाची व्यवस्था केली आणि चहा वितरित केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. भाऊसाहेब पाटील, श्री. विजय पाटील, श्री. विलास पाटील, श्री. ज्ञानेश्वर कोळी, श्री. मोतिलाल कोळी आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र कोळी यांचे मोठे सहकार्य लाभले.
शालेतील विद्यार्थ्यांचे युवा प्रशिक्षाणार्थी श्री. रुपेशसर महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या आनंददायी कार्यक्रमाने शाळेतील शिक्षणात्मक वातावरणात नवा उत्साह आणला आहे.


