प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न ———————————————– ● विद्यार्थ्यांनो स्वतः वर शिस्त लावा ● अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,रुसा,करिअर कौंसेलिंग सेंटर,युनिक अकॅडमी,पुणे यांचा संयुक्त उपक्रम ● पाठय पुस्तकांचा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा आरंभ
1 min read

प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न ———————————————– ● विद्यार्थ्यांनो स्वतः वर शिस्त लावा ● अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,रुसा,करिअर कौंसेलिंग सेंटर,युनिक अकॅडमी,पुणे यांचा संयुक्त उपक्रम ● पाठय पुस्तकांचा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा आरंभ

Loading

प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
———————————————–
● विद्यार्थ्यांनो स्वतः वर शिस्त लावा
● अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,रुसा,करिअर कौंसेलिंग सेंटर,युनिक अकॅडमी,पुणे यांचा संयुक्त उपक्रम
● पाठय पुस्तकांचा अभ्यास स्पर्धा
परीक्षेचा आरंभ
———————————————–
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर येथील अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA),करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री.तुकाराम जाधव (संस्थापक, द युनिक अकॅडमी,पुणे) हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्पर्धा परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात,पण टिकतात कमी. स्पर्धा परीक्षेची रचना कशी असते,त्यात कोण कोणते बदल झाले आहेत. याची संपूर्ण माहिती दिली. स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना वाचन व लेखन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे नियोजन करताना संपूर्ण परीक्षेची माहिती असायला हवी. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेची माहिती असायला हवी. वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकातून विषयाची तयारी करावी. अभ्यासक्रम व्यतिरिक्त स्वतःकडे शब्दसाठा व लेखन वाढवणे गरजेचे आहे. लेखन करताना व्याकरणाचा आधार घेऊन योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा. अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या व्याख्यानात दिली. या समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव हे होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे, डॉ.व्ही.बी.मांटे, डॉ.अमित पाटील, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, प्रा.डॉ.रवींद्र माळी, श्री.अशोक बिऱ्हाडे, डॉ.जितेंद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते.
प्रस्तुत मार्गदर्शन व्याख्यानासाठी डॉ.रवी बाळसकर, ग्रंथपाल दीपक पाटील, प्रा.पुष्पा पाटील, डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.विलास गावीत,प्रा.विजय साळुंखे,प्रा.नितेश कोचे, प्रा.रोहन गायकवाड, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.राखी घरटे, प्रा.सोनूसिंग पाटील, डॉ.हर्ष नेतकर, प्रा. दिलीप तडवी, प्रा.सचिन आवटे, प्रा.अमोल अहिरे, प्रा.हिमांशू गोसावी, डॉ.प्रदिप पवार, प्रा.सपकाळे,युनिक अकॅडेमीचे नरेंद्र पाटील,विकास गिरासे, शिखर अकॅडेमीचे ऍड.चंद्रभान पाटील याचप्रमाणे करिअर कॉन्सेरिंग सेंटरचे दिलीप शिरसाट, कैलास पाटील,पराग पाटील, विशाल अहिरे, अतुल धनगर, अक्षय सोनार, प्रशांत पाटील, पवन राजपूत, स्वप्नील राजपूत आदींनी विशेष सहकार्य केले.
यावेळी १५ दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित आदित्य पाटील, जान्हवी जोशी, मोहिनी पाटील व कुणाल वाडीले या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रमेश माने यांनी केले.श्री.तुकाराम जाधव यांचा परिचय करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी करून दिले आणि आभार प्रदर्शन कोर्स समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता व्हायोलीन वाद्याद्वारे राष्ट्रगीत सादर करून सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *