स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानपंधरवाड्याचा अकोला जिल्ह्यात शुभारंभ !*
1 min read

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानपंधरवाड्याचा अकोला जिल्ह्यात शुभारंभ !*

Loading

*स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानपंधरवाड्याचा अकोला जिल्ह्यात शुभारंभ !*

*अकोला* – अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला‌. दि‌.३० जानेवारीपासून सुरू झालेले हे अभियान दि‌ १३ फेब्रूवारी या सबंध पंधरवाड्यात सुरू राहणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शासकीय,निमशासकीय व खाजगी शाळांमध्ये आणि अकोला शहरातील भारत विद्यालय,सावित्रीबाई फुले विद्यालय व ग्रामीण भागातील शाळा़ंमधून कुष्ठरोग जनजागृतीपर प्रतिज्ञा व सपना संदेश ही नाटीका सादर करण्यात येत आहे.जिल्ह्यातील एकून ५३१ ग्रामपंचायतींमध्ये कुष्ठरोगाच्या घोषणापत्राचे वाचन करण्यात येऊन जनतेला आलाहन करणृयात आले.प्रजासत्ताकदिनी घेतलेल्या प्रतिज्ञेतून समाजामध्ये कुष्ठरूग्णांप्रती असणारा गैरसमज,भेदभाव किंवा सामाजिक कलंक म्हणून त्यांना मिळणारी वागणूक बदलणे ही काळाची गरज आहे.कुष्ठरोगी सुध्दा सामान्न्य नागरीक आहेत.त्यांना मुलभूत अधिकारांनी जीवन जगता यावे यासाठी समाजातील सर्व नागरीकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे विचार बिंबवण्यात आले.

पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या सुचनेनुसार,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न झाली.याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांच्या उपस्थितीत कुष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपसंचालक कार्यालयात डॉ.कमलेश भंडारी जिलवहा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे,सहा.संचालक डॉ.डी‌.टी रणमले,यांचे उपस्थितीतीत सुध्दा या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.यावेळी सहायृयक संचालक डॉ.आरती कुलवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ.चिमणकर, व सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *