१० वी,१२वी परीक्षेत केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलीला स्थगिति द्या.प्रोटानची मागणी
1 min read

१० वी,१२वी परीक्षेत केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलीला स्थगिति द्या.प्रोटानची मागणी

Loading

*१० वी,१२वी परीक्षेत केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलीला स्थगिति द्या.प्रोटानची मागणी

 

जळगाव प्रतिनिधी:-मार्च, फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या इ१०वी व १२वी च्या परीक्षेत केंद्र संचालक,पर्यवेक्षक,यांना स्वतःचे परीक्षा केंद्र सोडून इतर केंद्रावर पाठविण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वच स्तरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना विरोध करीत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ नाशिक विभागाने असा निर्णय घेवुन एका प्रकारे शिक्षकांवार अविश्वास दाखवलेला आहे.आपले मुळ केंद्र सोडून इतर केदावर केंद्र संचालक,पर्यवेक्षक म्हणून पाठवील्यास त्यांना तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा अडचणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शासनाने अथवा परीक्षा मंडळाने अशा प्रकारचा निर्णय घेताना शिक्षकाना अथवा संस्था चालकांशी कुठलीच चर्चा केलेली दिसत नाही.अशा प्रकारच्या निर्णया मुळे शासनाने शिक्षक शिक्षिका यांना संशयांच्या कठघरात उभे केले आहे.शिक्षक अध्यापनाचे काम करीत असताना प्रामाणिक पणे त्यांचे कार्य करीतअसून सुद्धा अशा प्रकारचे निर्णय योग्य वाटत नाही.
प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्र भर विरोध दर्शवित असुन शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची भूमिका घेत आहे.बोर्डाने निवेदनाची दखल घेवून,पर्येवेक्षक, केंद्र संचालक बदलीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा.परिक्षेच्या काळात विद्यार्थी अथवा शिक्षक यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी.निवेदनाची दखल न् घेतल्यास प्रोटान संघटन महाराष्ट्र भर आंदोलन करेल असा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्या कार्यात जावूंन प्रोटान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले निवेदन देताना प्रोटान संघटनेचे जिल्हा प्रभारी आनंद जाधव,उपाध्यक्ष राजेश वाढेकर,प्रा.धनराज सर पी डी भालेराव सर एम एम पाटील सर के एस राणे सर एन डी नेवे सर ए एस सोनोवणे सर भारुडे,सर बी डी सुरवाड़े सर गणेश काकडे,(म रा. उपाध्यक्ष.)आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *