शिरुड येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे प्रशिक्षण
![]()
शिरुड येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे प्रशिक्षण
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिरुड येथील व्ही झेड पाटील हायस्कूलमध्ये 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शालेय समिती अध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या सहकार्याने आणि शालेय समिती सदस्य डी. ए. धनगर सर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या सूचनेनुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवणे होय. यावेळी शाळेतील प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन, प्रथमोपचार, आणि ईव्हॅक्यूशन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
पथक प्रमुख सतीश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. या कार्यशाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके पाहून व अनुभवून आनंद घेतला. त्यांनी प्रथमोपचार कसे करावे याबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली व स्वतः प्रात्यक्षिके करून बघितली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपक्रमशील शिक्षक डी. ए. धनगर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणामधील माहिती त्यांच्या मित्रांना व पालकांना सांगून समाजात जागरूकतेसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता देशमुख मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी.जी. निकम यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी व्ही. डी. सूर्यवंशी, मंगलसिंग जाधव सर, राहुल लांडगे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.


