नवजीवन विद्यामंदिरात रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कार्यशाळा संपन्न.*  *रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी आरएसपी विषयाची आवश्यकता आहे: मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांचे प्रतिपादन*
1 min read

नवजीवन विद्यामंदिरात रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कार्यशाळा संपन्न.* *रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी आरएसपी विषयाची आवश्यकता आहे: मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांचे प्रतिपादन*

Loading

*नवजीवन विद्यामंदिरात रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कार्यशाळा संपन्न.*

*रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी आरएसपी विषयाची आवश्यकता आहे: मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांचे प्रतिपादन*

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) अभियान २०२५ निमित्ताने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त श्री.पंकज शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण डोंबिवली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस उपाउक्त श्री.संजय साबळे यांचा नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेन्द्र शिरसाट यांचा नियोजनानुसार,हा आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा सहकार्याने रस्ते वाहतूक सुरक्षा व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कल्याण पश्चिम येथील छत्रपति शिक्षण मंडळाचे नवजीवन विद्यामंदिरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल आर एस पी श्री बन्सीलाल महाजन यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविक ठाणे पालघर नाशिक विभागाचे आर एस पी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी हेल्मेट वापरणे ही काळाची गरज आहे याबद्दल उदाहरणासह विशेष माहिती दिली. तसेच स्वीट बेल्टच्या वापर का करावा याबाबत देखील विशेष माहिती दिली व कोणत्याही विद्यार्थ्याने अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही वाहन चालू नये याबाबत कायदेविषयक माहिती दिली. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक श्री सुरजीत सिंह चव्हाण यांनी 35 व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी शाळा सुटताना किंवा रस्त्याने चालताना रस्त्यावरून उजव्या बाजूने चालणे आवश्यक आहे तसेच रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग चा वापर करणे अनिवार्य आहे. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कल्याण डोंबिवली आर एस पी युनिटचे जिल्हा समादेशक श्री.अनंत किनगे यांनी पीपीटी च्या माध्यमातून वाहतुकीच्या संकेत चिन्हांची माहिती देताना रस्ते वाहतूक व नागरिक संरक्षण या विषयाचे महत्त्व व आर एस पी विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. नवजीवन विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री.सूर्यकांत चव्हाण सर यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की,विद्यार्थांमध्ये वाहतूक निर्माण बद्दल जागरूकता निर्माण व्हावी व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने हा उपक्रम व अभ्यासक्रम राबविणे अनिवार्य आहे असे सांगितले. नवजीवन विद्यालयात रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमाची जनजागृती व्हावी व कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सौ.मंदाकिनी सोनवणे यांनी वाहतूक विभागाची संपर्क साधून 35 व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे हवालदार युनिस मुलानी उपस्थित होते. सौ.भामरे यांनीही विशेष सहकार्य केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. भारती चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *