प्रजासत्ताक दिनानिमित्त तांदळीत ध्वजारोहण आणि शालेय गणवेश वितरणाचा विशेष कार्यक्रम
1 min read

प्रजासत्ताक दिनानिमित्त तांदळीत ध्वजारोहण आणि शालेय गणवेश वितरणाचा विशेष कार्यक्रम

Loading

प्रजासत्ताक दिनानिमित्त तांदळीत ध्वजारोहण आणि शालेय गणवेश वितरणाचा विशेष कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी

आज, 26 जानेवारी 2025 रोजी, जि. प. शाळा तांदळी व ग्रामपंचायत तांदळी येथे प्रजासत्ताक दिनाच्या उपलक्ष्यात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जि. प. शाळा तांदळी येथे दादासो श्री राकेश प्रकाश पाटील आणि ग्रामपंचायत कार्यालय तांदळी येथे नव्या सरपंच ताईसो सौ. रत्नाबाई सुनील परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत गायन, वेशभूषा, आणि भाषण स्पर्धा घेवून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्या विद्यार्थ्यांना बक्षीस रूपात आशीर्वाद देण्यात आले.
नवीन सरपंच ताईसो सौ. रत्नाबाई सुनील परदेशी यांनी त्यांच्या स्वखर्चातून जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरित केला. माननीय श्री विजयसिंह इंदलसिंग परदेशी (बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव) आणि दादासो श्री सुनील इंदलसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. अनपेक्षित गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
शाळेतील शंकरराव साहेबराव बोरसे सर व श्री सुधीर शांताराम चौधरी सर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या वतीने माननीय सरपंच यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अखेरीस श्री कुणाल रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य, यांनी खाऊ वितरण करून हा विशेष सोहळा संपवला. या कार्यक्रमात गावातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक वृंद, आणि महिला व पुरुष गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक श्री सुधीर चौधरी यांनी केले. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *