ज्ञानदा सायन्स क्लासेसमध्ये प्रजासत्ताक दिनाला भव्य स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ
1 min read

ज्ञानदा सायन्स क्लासेसमध्ये प्रजासत्ताक दिनाला भव्य स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ

Loading

ज्ञानदा सायन्स क्लासेसमध्ये प्रजासत्ताक दिनाला भव्य स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ज्ञानदा सायन्स क्लासेसमध्ये 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने झाली, आणि समारोप राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आला. 26 जानेवारी निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात देशभक्तीपर नाटक, एकांकिका, सांस्कृतिक गीते, शेतकऱ्याची व्यथा मांडणारे नाटक आणि व्यसनमुक्तीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदा क्लासचे संचालक प्रा. धिरज पवार सर यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालिका प्रा. सौ. स्वाती पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, आणि इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये मिळालेले उपयुक्त अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला.

 

 

 

 

 

 

 

प्रा धिरज पवार सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोर्डाच्या परीक्षेची भीती कशी काढावी आणि अभ्यासाच्या उपयोगी पद्धतींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा पाटील आणि कु. रोशनी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. आयुषी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती, ज्यामुळे हा सोहळा आणखी खास ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *