विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा: IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांचे अमूल्य अनुभव
![]()
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा: IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांचे अमूल्य अनुभव
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर येथील अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(RUSA) करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील(समादेशक,राज्य राखीव पोलीस दल,गट नंबर 8,कोरेगाव,मुंबई) यांनी कै. काकासाहेब शंकरराव राणे नाट्य सभागृहात
*नागरी सेवेतील परीक्षेत माझा प्रवास* या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
यावेळी सभागृहात 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदविला होता.आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाषेची फारशी काळजी न करता आपण परिश्रमातून भाषा अवगत केले पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेत भाषा येणे व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात महत्त्वाचे आहे, त्यांनी यावेळी स्वअनुभव कथन द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मोक्षदा पाटील मॅडम पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायाम करताना एखादा खेळ रोज खेळले पाहिजे,नियमित अभ्यास केला पाहिजे, आत्मविश्वास,दृढ निश्चय,नियोजन, तयारी याद्वारे स्पर्धा परीक्षाकडे पाहिले पाहिजे.
स्पर्धा परीक्षा एक चक्रव्यूह आहे,त्याला भेदण्यासाठी आपली संपूर्ण तयारी असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत संघर्ष करताना कोणतेही शॉर्टकट नाही अशी भूमिका घेऊन समाज माध्यमात काय योग्य व काय अयोग्य ? याची माहिती अथवा अभ्यास विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. शेवटी, विद्यार्थ्यांनी यावेळी आपले बहुविध स्वरूपाचे प्रश्न विचारले यात गायत्री पाटील,आदित्य पाटील,जानव्ही जोशी, स्नेहल शिसोदे,महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार मिलिंद पाटील, डॉ.अनिल शिंदे ,प्राचार्य ए.बी.जैन यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला.
या वेळी मोक्षदा पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर स्वअनुभवातून दिले आणि विद्यार्थ्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले.
शेवटी मोक्षदा पाटील म्हणाले की, *कोशिश करने वालों की हार नही होती* या आत्मविश्वास पूर्ण विधानातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले,त्यांच्यातला उत्साह वाढविला.
यावेळी विचार मंचावर खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक हरि भिका वाणी,योगेश मुंदडे, डॉ.अनिल शिंदे,संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे,संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन, संस्थेचे सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,
डॉ.कल्पना पाटील,कुलसचिव राकेश निळे,रुसा समन्वयक व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष प्रमुख डॉ.मुकेश भोळे,डॉ.प्रदीप पवार,प्रा.दिलीप तडवी उपस्थित होते.त्याचप्रमाणे अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय विकास देवरे हे सुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते.
प्रस्तुत मार्गदर्शन व्याख्यानासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील, डॉ.रवी बाळसकर, डॉ.शशिकांत सोनवणे, ग्रंथपाल दीपक पाटील, डॉ.राखी घरटे,डॉ.आर सी सरवदे, डॉ.महेंद्र महाजन,डॉ.माधव भुसनर,डॉ.बालाजी कांबळे, प्रा.पुष्पा पाटील,डॉ.नलिनी पाटील,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.वैशाली महाजन,प्रा.वैशाली राठोड,प्रा.इरफान कुरेशी,प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.सचिन आवटे, प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,प्रा. किरण पाटील,प्रा.उमेश येवले,डॉ.हेमंत पवार,डॉ.सुनिल राजपूत,डॉ.विलास गावित,प्रा.सुनिल रामचंद्र पाटील,प्रा.सी बी सूर्यवंशी,प्रा. देवेंद्र तायडे,प्रा.दिनेश भलकार,वरिष्ठ लिपिक भटू चौधरी,विजय ठाकरे,योगेश बोरसे,अजय साटोटे,दुर्योधन नेरकर,कमलाकर पाटील,बंटी कोठावदे,विश्वास पाटील,योगेश चौधरी,महेश मोरे,पवन शर्मा,अंबादास चावरीया याचप्रमाणे करिअर कॉन्सेरिंग सेंटरचे दिलीप दादा शिरसाट, पराग पाटील,विशाल अहिरे, अतुल धनगर, अक्षय सोनार,प्रशांत पाटील, पवन राजपूत, स्वप्नील राजपूत आदींनी विशेष सहकार्य केले.
यावेळी पत्रकार मिलिंद पाटील, पत्रकार विकी जाधव हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांचे मंचावर उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमात वाचन कौशल्य कार्यशाळा अंतर्गत प्रताप महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाने जे उपक्रम राबवले त्याचे प्रमाणपत्राचे देखील वितरण करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल दीपक पाटील यांनी प्रस्तुत प्रमाणपत्र वितरणाचे सूत्रसंचालन केले. त्याचप्रमाणे नानासाहेब य.ना.चव्हाण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चाळीसगाव येथे 24 जानेवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या संघातील स्वप्निल गुलाब पाटील,जानव्ही आशिष जोशी यांचा देखील सत्कार आयपीएस मोक्षदा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते विचार मंचावर करण्यात आला.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले.आयपीएस मोक्षदा पाटील यांचा परिचय करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी करून दिले आणि सर्वात शेवटी आभार प्रा.विजय साळुंखे यांनी मानले



