अमळनेर सी .आर .पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा
1 min read

अमळनेर सी .आर .पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा

Loading

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर सी .आर .पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक 26 जानेवारी रोजी 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला तसेच संस्थेचे चेअरमन श्री. महेश पाटील सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी  डॉ श्री. दिगंबर महाले सर मंगळ ग्रह मंदिर संस्थापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच श्री .रामकृष्ण लोटन पाटील मराठा बटालियन (15 arm)on dutyPunjab तसेच माजी नगरसेवक श्री .बाळासाहेब पवार यांनी मुख्य अतिथीची भूमिका बजावली श्री. महाले सर यांनी मुलांना प्रोत्साहन पर बक्षिसे दिली व आर्मी ऑफिसर रामकृष्ण लोटन पाटील यांनी मुलांचे मनोबल उंचवण्याचे काम केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . भारती पाटील यांनी केले आभार प्रदर्शन सौ. सोनाली पंकज यांनी केले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *