सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*
1 min read

सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*

Loading

*सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*

[ डॉ .कलाम पुस्तक भिशी तर्फे साहित्यिकांना आवाहन ]
सेवानिवृत्त मात्र आजीव ऋषितुल्य ज्ञानदाता , चिरंतन चिरतरुण समाजशिक्षक , अनेक ज्ञात अज्ञातांचे मानसगुरु , अनेक शैक्षणिक संस्थांचे व शैक्षणिक प्रकल्पांचे अजातशत्रू दिपस्तंभ अर्थात जळगाव डायटचे निवृत्त प्राचार्य आदरणीय नीळकंठ गायकवाड साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे.तुम्हा सर्वांना शब्दसुमनांचा वर्षाव कृतज्ञतेने विना दिक्कत करता यावा म्हणून अप्पासाहेबांच्या गौरवार्थ लेख स्पर्धा व काव्य स्पर्धेचे आयोजन डॉ. कलाम पुस्तक भिशीतर्फे करण्यात आले आहे.पुरस्कार हे ‘ साधन ‘ असून अप्पासाहेबांना अमृत महोत्सव निमित्ताने शब्दसुमनांची अनोखी भेट देता येईल हे सर्वार्थाने ‘ साध्य ‘ आहे हे सुज्ञास सांगणे न लगे नाही का ?
अप्पासाहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त करण्यासाठी या अनोख्या स्पर्धेचा अर्थात सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घेऊन बहुसंख्येने स्पर्धेची पोस्ट फॉरवर्ड करून इतरांनाही प्रोत्साहित करून स्पर्धा व्यापकपणे अल्पावधीत यशस्वी करावी ही भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे सर्वांना विनम्र आवाहन.
सर्वोत्कृष्ट लेख व कवितांना पुढील प्रमाणे बक्षिसे दिले जातील.
*सर्वोत्कृष्ट गौरवपर लेख पुरस्कार*
प्रथम पुरस्कार : – ३१०० रुपये ( प्रायोजक – ह.भ.प.मनोहरजी खोंडे सर )
द्वितीय पुरस्कार : – २१०० रुपये ( प्रायोजक – सोपान भवरे सर )
तृतीय पुरस्कार : – ११०० रुपये ( प्रायोजक – डॉ. विजय बागुल सर )
उत्तेजनार्थ पुरस्कार – ( प्रायोजक – महेश शिंपी सर )
१ ) ५०० रुपये
२ ) ५०० रुपये
*सर्वोत्कृष्ट कविता पुरस्कार*
प्रथम पुरस्कार : – २१०० रुपये ( प्रायोजक – ज्योती राणे मॅडम )
द्वितीय पुरस्कार : – १५०० रुपये ( प्रायोजक – उषाताई सोनार मॅडम )
तृतीय पुरस्कार : – १००० रुपये ( प्रायोजक – सुदाम बडगुजर सर )
उत्तेजनार्थ पुरस्कार ( प्रायोजक – अरुण वांद्रे सर )
१ ) २५१ रुपये
२ ) २५१ रुपये
समस्त सन्माननीय पुरस्कारार्थींना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
*स्पर्धेचे नियम व अटी*
१ ) स्पर्धा सर्वांसाठी निःशुल्क आहे.
२ ) स्पर्धा शिक्षण क्षेत्रातील अधिकारी , शिक्षक , कर्मचारी यांच्या पुरती सिमित नसून समस्त कार्यरत तसेच सेवानिवृतांसाठीही खुली आहे.
३ ) अन्य क्षेत्रातील ज्या भाग्यवंतांना अप्पांचा सहवास , मार्गदर्शन मिळाल्याचे अहोभाग्य प्राप्त झाले त्यांनाही स्पर्धेत सहभागी होता येईल.
४ ) एका व्यक्तीला दोन्ही स्पर्धेत भाग घेता येईल परंतु एकाच विभागात बक्षीस देण्यात येईल.
५ ) लेख व कवितांना शब्द मर्यादा नाही.
६ ) ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्यक्ष लेखी स्वरुपात लेख अथवा कविता द्याव्यात.
७ ) इतरांनी लेख व कविता वर्ड आणि पीडीएफ दोन्ही फॉर्मेट मध्ये पाठविणे नियमाधीन आहे.वर्ड मधील मजकूर युनिकोड फॉन्ट मध्येच असावा.फॉन्ट साईज १२ – १३ दरम्यान वापरावी.
८ ) स्पर्धकांनी लेख व कविता पुढील पुस्तक भिशीच्या संस्थापक सभासदांच्या व्हाट्सअप वरती पाठवून उपकृत करावे.
* ह.भ.प.मनोहर खोंडे सर – ९२७२३२८४५८
* विजय सुपडू लुल्हे – ९९२३३१५२११
* अजय भामरे सर – ( लेखन मंच संपादक ) – ८८३०३४३७३६
* सोपान भवरे सर – ( लेखन मंच उपसंपादक ) -९०७५४१७०३२
* डॉ. विजय बागुल – ९४०५७९१५७३
* ज्योती राणे मॅडम – ७५८८१९२११०
* सुनिल दाभाडे सर – ९८२२०१७८८४
स्पर्धेचा निकाल २ / ३ फेबुवारी २०२५ तारखेला पोर्टल / दैनिकात घोषित करण्यात येईल असे एका प्रसिद्धी पत्रकान्वये स्पर्धेचे मुख्य संयोजक मनोहर खोंडे सर , विजय लुल्हे , उषाताई सोनार मॅडम व ज्योती राणे मॅडम यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *