वि.या.पाटील माध्य. विद्यालय करणखेडा या शाळेवर आज दिनांक 26 जानेवारी 2025 “भारतीय प्रजासत्ताक दिन” मोठ्या उत्साहाने साजरा*.
![]()
*वि.या.पाटील माध्य. विद्यालय करणखेडा या शाळेवर आज दिनांक 26 जानेवारी 2025 “भारतीय प्रजासत्ताक दिन” मोठ्या उत्साहाने साजरा*.
अमळनेर प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सकाळी 7 वाजेला शाळेवरून विद्यार्थ्यांची गावात घोषणा देत प्रभात फेरी निघाली. विविध संस्थांचे ध्वजरोहन करून,करणखेडा शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे स्थानिक चेअरमन आदरणीय आबासो, श्री. विश्वासराव विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व ध्वजारोहणासाठी गावातील सर्व मान्यवर, नागरिक उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकारे संचलन करून कवायतीचे वेगवेगळे प्रकार करून दाखवले. व उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यानंतर मागील वर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत,परीक्षेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून आपला क्रमांक पटकावला अशा सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे स्थानिक चेअरमन आबासो, श्री.विश्वासराव विनायकराव पाटील यांच्या हस्ते व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच मागील वर्षी इयत्ता 10 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै.शरदराव शिवाजी गरुड यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे “भारतीय प्रजासत्ताक दिनाचा” कार्यक्रम अतिशय उत्साहाने व मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एन.एस. पवार सर यांनी रूपरेषा ठरवली. सूत्रसंचालन,आदरणीय श्री पी.वाय. पाटील सर यांनी केले प्रास्ताविक,आदरणीय श्री ए.बी.धनगर सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन आदरणीय श्री. ए.एस.पांडे सर यांनी केले व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी मोलाचे योगदान दिले.

