शिक्षक कर्मचाऱ्यांचे पुणे येथे “करो या मरो” आंदोलन: जुनी पेन्शन व उपदानाची न्यायी मागणी
![]()
शिक्षक कर्मचाऱ्यांचे “करो या मरो” आंदोलन: जुनी पेन्शन व उपदानाची न्यायी मागणी
अमळनेर प्रतिनिधी
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन मिळवणे व सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवानिवृत्त उपदान व मृत कर्मचाऱ्यांना मृत्यू उपदान मिळावे यासाठी.पीडित शिक्षक पुणे आयुक्त कार्यालय समोर “करो या मरो” या पद्धतीने बेमुदत आंदोलन करणार.
आमदार जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांची भेट घेण्यात आली. आयुक्तांनी सविस्तर चर्चासाठी पुढील आठवड्यात भेट घेण्यास सांगितले आहे. आमदार यांनी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह व शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांना या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करा. हजारो कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना शासनाकडून कोणतेच लाभ न मिळाल्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक फारच दयनीय अवस्था आहे, असे ठणकावून सांगितले.
आयुक्त कार्यालय व शिक्षण विभाग यांनी सदर शिक्षकांच्या बाबतीत आतापर्यंत 1982 ची जुनी पेन्शन व सेवानिवृत्त उपदान, मृत्यू उपदान इत्यादी लाभ मिळावे म्हणून कोणताही पाठपुरावा केलेला नसल्यामुळे शिक्षकांसाठी ही बाब न्यायिक असून सुद्धा न्याय मिळत नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचीच नकारात्मक भूमिका या भेटीमध्ये स्पष्ट जाणवली आहे. कायदेशीर बाबींचा पाठपुरावा कागदो पत्री करत असताना, फक्त शासनाचे प्रमुख अधिकारी (boss is always right – म्हणून बेजबाबदारपणे त्यांनी उत्तरे दिली आहेत. त्या उत्तरांना कुठेही कायदेशीर पुरावा नव्हता.
*संविधानाद्वारे अस्तित्वात असलेल्या जुनीच पेन्शन योजनेच्या कायद्याची पायमल्ली महाराष्ट्र शासनाने करून, न्यायालयाची सुद्धा दिशाभूल केली आहे*.त्याचे मृतिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 2020 ची अधिसूचना काढली??? व 11 डिसेंबर 2020 रोजी ही अधिसूचना रद्द केली ??? याचा अर्थ असा की महाराष्ट्र शासन 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या वर 100 टक्के न्यायिक असून सुद्धा अन्याय करत आहेत.
म्हणूनच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांनाही सेवानिवृत्त उपदान, मृत्यू उपदान तसेच 1982 ची जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने तातडीने कार्यवाही व्हावी. अन्यथा सौ.संगीताताई शिंदे* यांच्या मार्गदर्शनाखाली 13 फेब्रुवारी 2025 पासून पुणे आयुक्त कार्यालय समोर, या शासन धोरणाविरुद्ध, संघर्षांचा अंतिम लढा म्हणून *”करो या मरो”* या पद्धतीने शिक्षक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
*यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीचे प्रा. दिलीप डोंगरे, सुदेश जाधव, आशुतोष पवार, कल्याण वाघ, भास्कर भोसले, सुखदेव मोहिते, के. व्ही. देसले ,वाडकर एस. एच., मडके . व्ही. डी. देवराम वाळुंज, पी.पी थोपटे, अनिल ढमढेरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते*
प्रतिक्रिया…
*संगीताताई शिंदे – आंदोलन न केल्यास व आपण सर्व या अंतिम समयी एकत्र न आल्यास आपल्याला सेवानिवृत्तीनंतर मिळणारे सेवानिवृत्त उपदान, मृत्यू उपदान व आपली जुनीच पेन्शन मिळेलच याची खात्री वाटत नाही. म्हणून आपण सर्व पेन्शन पीडित बांधवांनी, विशेषता सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी 100% या आंदोलनात सहभागी व्हावेच लागेल.*ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे*.

