जि.प.शाळा थोरगव्हाण प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !…. शालेय क्रिडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा ग्रंथ, मेडल व प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव !… आदर्श शिक्षक निलेश धर्मराज पाटील यांचा शाल गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या वतीने सत्कार !….
![]()
जि.प.शाळा थोरगव्हाण प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !….
शालेय क्रिडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा ग्रंथ, मेडल व प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव !…
आदर्श शिक्षक निलेश धर्मराज पाटील यांचा शाल गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या वतीने सत्कार !….
यावल प्रतिनिधी –
यावल – तालुक्यातील थोरगव्हाण येथे दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शालेय क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. ह्या क्रिडा स्पर्धेत जि.प प्राथ. शाळा थोरगव्हाण येथील ८६ विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विजय मिळवीला. दि. २६ जानेवारी रोजी जि.प. शाळा थोरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र देवरे यांनी केले. ध्वजारोहण प्रसंगी गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ, ग्रामंपचायत समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत झाल्या नंतर इ. ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांनी धरतीची आम्ही लेकर या कवितेवर कृतियुक्त नृत्य सादर केले. तदनंतर ह्या महिन्यात शाळेत धावणे, गोणपाट शर्यत , बेडूक उडया , तीन पाय शर्यत , चित्रकला , रांगोळी स्पर्धा , सर्कल गेम , संगीत खुर्ची , बादलीत चेंडू टाकणे अशा विविध स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक वर्गातील मुला व मुलींनी प्रथम क्रंमाक मिळवला म्हणून आमच्या गावातील ग्रामपंचायत थोरगव्हाण येथील लोकनियुक्त सरंपच सौ.मनिषाताई समाधान सोनवणे यांच्या कडून विजयी सर्व विद्यार्थ्याना शालेय उपयोगी शैक्षणीक साहित्य व मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वाटप प्रसंगी शिक्षण प्रेमी समाधान भाऊ सोनवणे, भारत पाटील, ग्राम पंचायतीचे संरपच सौ.मनिषाताई सोनवणे व ग्रामपंचायत समिती चे सर्व सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.तसेच विजयी विद्यार्थ्यांना श्री.निलेश धर्मराज पाटील व संदिप सोनवणे यांच्या कडून केंद्रीय क्रिडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना धरणगाव महात्मा फुले हायस्कूल येथील आदर्श शिक्षक पी डी पाटील सर लिखीत आदर्श महामाता ग्रंथ भेट देऊन सन्मानीत केले. तसेच विद्यार्थाच्या यशामागे शिक्षकाचे कर्तुत्व असते. त्याच्या यशामागे कुणी तरी त्यांना प्रोत्साहीत करणारे शिक्षक असतात म्हणून जि.प.शाळा थोरगव्हाण येथील आदर्श शिक्षक श्री.निलेश धर्मराज पाटील यांना ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती कडून शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट व चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले . बक्षिस मिळाल्यावर सर्व विद्यार्थ्याचा आनंद गगणात मावेनासा झाला . कार्यक्रम प्रसंगी सुत्रसंचलन व आभार निलेश माधवराव पाटील यांनी केले.


