अमळनेरला भव्य रक्तदान शिबीर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व कै. प्रा. आर. के. केले काॅलेज यांचा संयुक्त उपक्रम
1 min read

अमळनेरला भव्य रक्तदान शिबीर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व कै. प्रा. आर. के. केले काॅलेज यांचा संयुक्त उपक्रम

Loading

अमळनेरला भव्य रक्तदान शिबीर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व कै. प्रा. आर. के. केले काॅलेज यांचा संयुक्त उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कै. प्रा. आर. के. केले काॅलेज बी. फार्मसी, अमळनेर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक मंडळाचे कार्य उपाध्यक्ष निरजजी अग्रवाल, योगेश मुदंडे, प्रदिप अग्रवाल, डॉ. अनिल शिंदे, सौ. वसुंधरा लांडगे, प्रा. ए. बी. जैन सर, प्रा. रविंद्र सोनवणे सर, प्रा. रवींद्र माळी सर, अभाविप विभाग संयोजक भाविन पाटिल, शहरमंत्री धिरज माळी आणि केमिस्ट संघटनेचे प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.
जळगाव जिल्हा खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी या शिबीराला भेट देऊन अभाविप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मा. सिनेट सदस्य दिनेश नाईक, अभिषेक पाटील आणि मनोहर सोनवणे देखील उपस्थित होते.

 

 

 

 

 

दिवसभरात ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले, आणि रक्तदान केलेल्या सर्व नागरिकांना व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व भेट वस्तू देण्यात आल्या. सायंकाळी या कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी प्रा. धिरज वैष्णव सर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य चौधरी, जयेश सोनवणे, चैतन्य वाघ, मंगेश मदने, जयेश ठाकरे, हिमांशू पाटील, हिमांशू जोशी, दिव्या मराठे आणि अन्य कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे होते.
या भव्य शिबीरामुळे रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढीस लागली असून समाजातील एकत्वाची भावना प्रकट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *