महात्मा फुले हायस्कूल मध्ये कॉपीमुक्त अभियान सप्ताह उत्साहात संपन्न !..  पालक – शिक्षक सहविचार सभेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरण !….
1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये कॉपीमुक्त अभियान सप्ताह उत्साहात संपन्न !.. पालक – शिक्षक सहविचार सभेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरण !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये कॉपीमुक्त अभियान सप्ताह उत्साहात संपन्न !..

पालक – शिक्षक सहविचार सभेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरण !….

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पालक – शिक्षक सहविचार सभेअंतर्गत कॉपीमुक्त अभियान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक समिती प्रमुख एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी पालकांमधून नितीन चंडाले व अल्का भोई उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व पालकांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पालक – शिक्षक समिती प्रमुख पी डी पाटील यांनी कॉपीमुक्त अभियान व गैरमार्गाशी लढा या संदर्भात विस्तृत चर्चा केली व मुलांना मार्गदर्शन केले.वर्गशिक्षक एस व्ही आढावे यांनी विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्डाच्या परीक्षेविषयी मार्गदर्शक सूचना केल्या. या सभेला पालकांनी देखील मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पालकांच्या व मुख्याध्यापकांच्या हस्ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार यांनी पालकांशी संवाद साधून पालकांचे व विद्यार्थ्यांचे शंकांचे निरसन केले व विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. समारोपाप्रसंगी २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन कोळी तर आभार व्ही टी माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *