टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने खातगुण शालेय विद्यार्थी दत्तक योजना जाहीर. शिक्षणाचा खातगुण पॅटर्न प्रारंभ करणारी कार्यशाळा उत्साहात संपन्न.
![]()
टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने खातगुण शालेय विद्यार्थी दत्तक योजना जाहीर.
शिक्षणाचा खातगुण पॅटर्न प्रारंभ करणारी कार्यशाळा उत्साहात संपन्न.
विशेष प्रतिनिधी (उदय नरे)
टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील खातगुण या गावी खातगुण शालेय विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. बुधवार दि. 22 जानेवारी रोजी वेदावती हायस्कूल येथे याचा शुभारंभ झाला. यावेळी विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती लक्षणीय होती.
टार्गेट खातगुण शालेय विद्यार्थी दत्तक योजनेमार्फत
1) खातगुणमध्ये लवकरच अत्याधुनिक ग्रंथालय आणि फक्त विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका उभारणे,
2) ग्रंथालयामार्फत इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विदयार्थ्यांसाठी मागेल त्याला मागेल ते पुस्तक (पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त) देणे,
3) खातगुणमधील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून इयत्ता 12 वी तसेच त्यापुढील स्पर्धा परीक्षांसाठी त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी पाऊले उचलणे,
4) त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिविर, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, इ. चे आयोजन करणे
असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती टार्गेट पब्लिकेशनचे संचालक अगस्ती अरुण लावंड यांनी दिली आहे.
आज झालेल्या कार्यशाळेत इ. 10 वी च्या विद्यार्थी आणि पालकांसाठी शैक्षणिक आयुष्य व दृष्टीकोन बदलणारी शिक्षणाचा खातगुण पॅटर्न प्रारंभ करणारी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत इ. 10 च्या मार्कांचे महत्त्व, शेवटच्या 30 दिवसात अभ्यासाच्या सोप्या पद्धती, परिक्षेपूर्वी आहार आणि ताणतणाव संतुलन, परिक्षेपूर्वी व परीक्षा काळात पालकांची भूमिका याबद्दल समुपदेशन करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या शंका, प्रश्न याबद्दलही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना टार्गेट पब्लिकेशनच्या वतीने प्रश्नसंचाचे वाटपही याच कार्यशाळेत करण्यात आले, अशी माहितीही लावंड यांनी दिली.


टार्गेट पब्लिकेशन आणि अगस्ती अरुण लावंड यांच्या प्रयत्नाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे खातगुण मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी चांगले मार्क संपादित करण्याची संधी त्यांना निर्माण होणार आहे. असा विश्वास कार्यशाळेनंतर विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केला.


