मतदार जागरूकतेचा उत्सव: राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम अमळनेरमध्ये संपन्न !
![]()
मतदार जागरूकतेचा उत्सव: राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम अमळनेरमध्ये संपन्न !
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे आज राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांचे कार्यालय एकत्रितपणे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम वेगवेगळ्या आकर्षक उपक्रमांसह उत्साहात पार पडला.
यादरम्यान रांगोळी स्पर्धा, पोस्टर/चित्रकला स्पर्धा, पथनाट्ये सादरीकरण आणि श्रमदान मोहीम यांसारखे विविध कार्यकम सजवले गेले. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, रूक्मिणी ताई महिला महाविद्यालय, प्रताप महाविद्यालय अमळनेर आणि एन एम पाटील महाविद्यालय मारवड येथील विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिसरात श्रमदानाची मोहिम राबवली. यावेळी, स्वयंसेवक सागर कोळी आणि त्यांच्या टीमने आकर्षक पथनाट्य सादर केले, तर महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमासाठी प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसिलदार प्रशांत धमके आणि नितीन ढोकणे यांच्यासह विविध कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे कौतुक करीत उपस्थित अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल प्रशंसा व्यक्त केली.
विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार असून, हा कार्यक्रम मतदार जागरुकतेसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट ठरला आहे!


