भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवदिन: पिंपळे बु. मधील विशेष कार्यक्रम!
1 min read

भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवदिन: पिंपळे बु. मधील विशेष कार्यक्रम!

Loading

भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरवदिन: पिंपळे बु. मधील विशेष कार्यक्रम!

अमळनेर प्रतिनिधी

दिनांक 24/1/2025 रोजी कै. सुकलाल आनंदा पाटील माध्य. विद्या, पिंपळे बु. येथे “प्राथमिक शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर व राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान” अंतर्गत भारतीय संविधानाचा गौरवदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमाचे नेतृत्व विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापूसो. श्री. एस एच भोसले सर यांनी केले. शालेय सभागृहात, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. एम पी निकम सर यांनी संविधानाचे महत्व आणि त्याचे अलौकिक फायदे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बापुसो. भोसले सरांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांचा विशेष उल्लेख करून, त्याचे समाजातील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची रक्षा करण्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सी एन पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शनाचे कार्य श्रीमती. शिरसाठ मॅडम यांनी केले.

या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. बी पाटील सर, श्री. जी जे पाटील सर, श्रीमती. गुमणार मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा उत्सव साजरा करून, या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. शिक्षण क्षेत्रातील या प्रकारचे उपक्रम, आमच्या गणराज्याच्या भूमिकेला आणखी मजबुत बनवतात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *