लोकमंगल पतसंस्थेच्या सदस्य सल्लागारपदी डॉ.रवींद्र भोळे यांचे नियुक्ती
1 min read

लोकमंगल पतसंस्थेच्या सदस्य सल्लागारपदी डॉ.रवींद्र भोळे यांचे नियुक्ती

Loading

उरुळी कांचन,(प्रतिनिधी):-लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा उरुळी कांचनच्या सल्लागारपदी अक्षदा कांचन, जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे, शंकर सोनवणे, शुभांगी परीट, परिघा कांचन, अलका मदने, रतिकांत यादव, नंदकुमार मुरकुटे, संतोष चौधरी, अशोक गव्हाणे, अशोक कदम यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी दिले. यावेळी पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकमंगल पतसंस्थेचे संस्थापक तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भरारी घेतली असून महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था आहे. पतसंस्थे मध्ये १२०० कोटींची ठेवी असून ९०० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. यावेळी पुणे विभागीय अधिकारी कमलाकर पाटील, हडपसर बॅकेचे सल्लागार रेखा कानकाटे, उरुळी कांचन शाखेचे शाखाधिकारी अभिजीत साखरे, मयुरी बोडके, मृणाल कांचन, अनिकेत जगताप आदी कर्मचारी, सभासद ठेवीदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *