अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यात यश!  आधार संस्थेच्या तातडीच्या कारवाईमुळे एक बालविवाह टळला!
1 min read

अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यात यश! आधार संस्थेच्या तातडीच्या कारवाईमुळे एक बालविवाह टळला!

Loading

अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यात यश!

आधार संस्थेच्या तातडीच्या कारवाईमुळे एक बालविवाह टळला!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज 21 जानेवारी 2025 रोजी, आधार संस्थेकडे अमळनेर शहरात बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्वरित कार्यवाहीसाठी आधार संस्थेचे कार्यकर्ते माहिती देत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलिस निरिक्षक आणि तहसिलदार यांना अधिसूचना केली.
यामुळे, श्री प्रशांत धमके (नायब तहसिलदार), श्री पिंगळे (पोलिस निरीक्षक), श्रीमती प्रेमलता पाटील (एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी), श्रीमती योगिता चौधरी (संरक्षण अधिकारी), आणि श्रीमती ज्ञानेश्वरी पाटील (आधार संस्था प्रतिनिधी) यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
बोरसे गल्ली भागात या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित मुलीच्या आधार कार्डानुसार जन्म तारीख 02/01/2008 असल्याने, बालविवाह थांबवण्यात यश मिळालं.
पोलिस स्टेशन अमळनेर येथे पुढील तपास आणि संबंधितांचे जाब जबाब नोंदवण्याचे कार्य सुरु आहे.
उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्याकडून याबाबतची माहिती घेण्यात आली, आणि आम्ही कारवाईवर लक्ष ठेवून आहोत असे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *