अमळनेरला उदयापासून पतंजली योगपीठातर्फे भव्य निःशुल्क योग शिबीर
1 min read

अमळनेरला उदयापासून पतंजली योगपीठातर्फे भव्य निःशुल्क योग शिबीर

Loading

अमळनेरला उदयापासून पतंजली योगपीठातर्फे भव्य निःशुल्क योग शिबीर

अमळनेर प्रतिनिधी
पतंजली योगपीठ आणि महिला पतंजली योग समिती, महाराष्ट्र पूर्व यांच्या तत्वावधानात एक भव्य निःशुल्क योग शिबीर आयोजीत केले आहे. हे शिबीर २२ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान छत्रपति शिवाजी नाट्य सभागृहातील पटांगणात होणार आहे.
या शिबीरात हृदय रोग, उच्च रक्तदाब, कंबर दुखी, एकाग्रता वाढवणे, संधिवात, मधुमेह तसेच इतर अनेक रोगांच्या निवारणीसाठी विशेष सत्रे ठेवण्यात आलेली आहेत. पुरुष, महिला आणि मुलामुलींसाठी हे शिबीर निःशुल्क आहे, जे आरोग्य सुधारण्यासाठी अनमोल संधी देईल.
उद्घाटन समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, यामध्ये . श्रीमती स्मिताताई उदय वाघ (खासदार, जळगांव लोकसभा जळगांव ,आ. अनिल भाईदास पाटील (मा. मंत्री, मदत, पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन), मा. सौ. जयश्रीताई अनिल पाटील (जि.प. सदस्या), , मा. सौ. संजीवनीताई माने (योगरत्न पुरस्कार प्राप्त), आणि मा. सौ. महानंदा पाटील (चोमरुन पुरस्कार) यांचा समावेश आहे.योग शिबीराचे तपशील: तारीख: २२/०१/२०२५ ते २४/०१/२०२५ठिकाण छत्रपति शिवाजी महाराज नाट्य गृह प्रांगण वेळ: सकाळी ५:३० ते ७:००,विशेष सत्र २४ जानेवारी २०२५ रोजी आ. संजीवनीताई माने यांच्या उपस्थितीत होणार आहे.
हा शिबीर सर्व वयोगटांसाठी (आबालवृद्ध) निःशुल्क आहे. येताना रिकाम्या पोटी येणे आवश्यक आहे आणि आपल्या चटई सतरंजीसह आणणे विसरू नका. अधिक माहितीसाठी 9405851777/9420382034/9284977298 या संपर्क नंबरवर संपर्क साधा.
आरोग्याच्या दिशेने एक पाऊल उचला आणि या अनमोल संधीचा लाभ घ्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *