एका लग्नाची कोर्टातील गोष्ट” सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांचा इन्फोटेनमेंट कार्यक्रम समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संपन्न
![]()
“एका लग्नाची कोर्टातील गोष्ट”
सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांचा इन्फोटेनमेंट कार्यक्रम
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संपन्न
अमळनेर
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महविद्यालय अमळनेर येथे
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ,विदयार्थी विकास विभाग संयुक्त विद्यमाने
आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांचा “एका लग्नाची कोर्टातील गोष्ट” हा ब्रिटिश कालीन इतिहास कालखंडातील घटनेवर आधारित एक कल्पक असा इन्फोटेनमेन्ट कार्यक्रम प्रभावीपणे अभिनय, गाणे , कथा द्वारे प्रोजेक्टर वरून सादकरण केले.
अध्यक्ष म्हणून संचालिका
अनुरूपा अभिजीत भांडारकर, अतिथी भारती गाला, प्राचार्य डॉ पी एस पाटील उपस्थीत होते .
यशस्वितेसाठी डॉ अस्मिता सरवैय्या, प्रा डी आर ढगे, डॉ श्वेता वैद्य, डॉ अनिता खेडकर , डॉ जगदिश सोनवणे , दर्शना पवार , पूजा पाटील यांचे सह प्राध्यापक, कर्मचारी, विदयार्थी यांनी सहभाग नोंदविला.
सूत्र संचालन कीर्ती सोनवणे रोहिनी धनगर यानी तर आभार प्रदर्शन मोहिनी पाटील यांनी व्यक्त केले.


