स्पर्धा परीक्षेत संकल्पनात्मक स्पष्टता महत्वाचे- विकास गिरासे यांचे प्रतिपादन*
![]()
*स्पर्धा परीक्षेत संकल्पनात्मक स्पष्टता महत्वाचे- विकास गिरासे यांचे प्रतिपादन*
————————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत रुसा, करिअर कौन्सिलिंग सेंटर,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या चौथ्या दिवसाचे मार्गदर्शन युनिक फाउंडेशनचे विकास गिरासे यांनी आज सकाळी 10 ते 12 व दुपारी 1 ते 3 दरम्यान विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील परीक्षेचे विविध टप्पे,स्वरूप व कार्यपद्धती या संदर्भात सूक्ष्मत्वाने मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या व्याख्यानात असे म्हटले की, एमपीएससी परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अकरावीपासून स्पर्धा परीक्षा समजून घेणे महत्त्वाचे आहे.सन 2025 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार त्याची तयारी करणे आज काळानुरूप महत्त्वाचे आहे, या परीक्षेत असणाऱ्या पॅटर्न संबंधी चर्चा करून पेपरमध्ये आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाची आणि त्यानुसार नियोजन कसे करावे याबाबत सूक्ष्मत्वाने चर्चा विकास गिरासे चर्चा केली.
प्रस्तुत चर्चा करताना स्पर्धा परीक्षेत संकल्पनात्मक स्पष्टता असल्याशिवाय आपणास स्पर्धा परीक्षेत यश मिळणार नाही म्हणून प्रश्न पूर्णपणे व नीटपणे समजून घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवगत करून त्या भाषेवरील प्रभुत्व निर्माण करावे,कौशल्य आत्मसात करावे कारण कौशल्य जीवनात कधीच वाया जात नाही. निर्णय प्रक्रिया सक्षम करावी जेणेकरून प्रश्न हाताळण्यात विलंब होणार नाही.
या यावेळी विकास गिरासे यांचे स्वागत व सत्कार करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले. प्रस्तुत मार्गदर्शन अभ्यास कोर्सचे सूत्रसंचालन गणित विषयाचे सहाय्यक प्रा.रोहन गायकवाड यांनी केले.
या प्रसंगी डॉ.आर सी सरवदे, ग्रंथपाल दीपक पाटील,डॉ.बालाजी कांबळे, प्रा.हिमांशू गोसावी, प्रा.अमोल अहिरे, डॉ.राखी घरटे, डॉ.प्रदीप पवार, श्री.दिलीप शिरसाठ,श्री.पराग पाटील,अतुल धनगर,विशाल अहिरे आदी उपस्थित होते.


