पिंपळे आश्रम शाळेत गीत गायन स्पर्धा *
![]()
*पिंपळे आश्रम शाळेत गीत गायन स्पर्धा *
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 18 जानेवारी 2025 ,वार शनिवार रोजी. *आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत* अनुदानित आश्रम शाळा पिंपळे येथे गीतगायन स्पर्धेचा अनोखा उपक्रम घेण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. संगीत हे माणसाच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करत असते, संगीतामुळे माणसाचे मन प्रसन्न होते. या संकल्पनेतून आश्रम शाळेचे बहुआयामी शिक्षक श्री सतीश कागणे यांनी या स्पर्धेचे नियोजन केलेले होते. सदर स्पर्धेत इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी कराओके ट्रॅक वर सु मधुर गीते सादर केली व भविष्यात उत्कृष्ट गायक बनण्याचा संकल्प केला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अविनाश अहिरे व प्रमुख पाहुणे श्री उदय पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वप्निल एल. पाटील यांनी केले.स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून श्री बाळासाहेब बोरसे व श्री विनोद महाले यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेमध्ये प्रिया मांगू पावरा (प्रथम) भारती सखाराम पावरा (द्वितीय) ललिता भिमसिंग पावरा व अंकिता जयसिंग पावरा (तृतीय), बसंती ग्यारसीलाल पावरा व अंकिता जयसिंग पावरा( चतुर्थ) क्रमांक मिळविला. संस्थेचे अध्यक्ष विद्याताई पाटील व सचिव श्री युवराज पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

