माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळाने आयोजित केला हळदीकुंकू कार्यक्रम
1 min read

माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळाने आयोजित केला हळदीकुंकू कार्यक्रम

Loading

माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळाने आयोजित केला हळदीकुंकू कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी- काल, १६ जानेवारी २०२५ रोजी, पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक हॉल येथे माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळाची मासिक सभा पार पडली. या सभेत संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.
जेष्ठ महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत, खेळांच्या आनंदात सामील झाल्या. ‘नींबूचमचा’, ‘संगीतखुर्ची’, ‘आंधळी कोशिंबीर’ आणि ‘गाण्याचा भेंड्या’ यांसारख्या खेळांमध्ये महिलांनी आपली चांगलीच कला दाखवली. जुन्या आणि नव्या गाण्यांच्या तालावर भक्ति गीतांच्या सादरीकरणाने वातावरण रंगतदार बनले.
हळदीकुंकू कार्यक्रमात विशेष महत्त्व देण्यात आले, जिथे विधवा माताभगिनींना हळद-कुंकू वाण देण्यात आले तसेच त्यांच्या कडून मंडळाचा हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या संचालिका रजनी पाटील, सुनिताताई सोनवणे, मीनाताई पाटील, पुजाताई पाटील, सुंदरताई पाटील, सुनंदाताई साळुंके, उषाताई पाटील आणि शंकुंतलाताई जाधव उपस्थित होत्या.
मंडळाच्या अध्यक्षा रजनी पाटील यांचा मंडळातर्फे शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आला, तसेच उषाताई पाटील यांच्याद्वारे साडी फुलंगुछ देऊन सत्कार करण्यात आला. या आनंददायी वातावरणात खेळात विजयी झालेल्या महिलांना बक्षीस देण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली, ज्याने सर्व सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *