स्पर्धा परीक्षेत आर्थिक आणि सामाजिक विकास महत्वाचा घटक* युनिकचे अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ——————————–
1 min read

स्पर्धा परीक्षेत आर्थिक आणि सामाजिक विकास महत्वाचा घटक* युनिकचे अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ——————————–

Loading

*स्पर्धा परीक्षेत आर्थिक आणि सामाजिक विकास महत्वाचा घटक*
युनिकचे अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन
————————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA),अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), करिअर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्यावतीने आयोजित 15 दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाचे मार्गदर्शन करताना श्री अंकुश देशमुख यांनी ‘अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थशास्त्र’, ‘आर्थिक आणि सामाजिक विकास’, यावर विशेष असे सूक्ष्म मार्गदर्शन केले.
युनिकचे श्री देशमुख पुढे म्हणाले की, संघ लोकसेवा आयोग परीक्षेची(UPSC) तयारी करताना विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या राज्य व केंद्र स्तरावरील अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन त्यातून सखोल माहिती प्राप्त केली पाहिजे. अर्थशास्त्र या विषयावर दहा ते अठरा प्रश्न पडण्याची शक्यता असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विषयावर पकड मिळविणे आणि अभ्यास करणे गरजेचे आहे. जगात व भारतात वस्तू व सेवांचे वितरण कसे आहे ? उपभोग शास्त्र म्हणून अर्थशास्त्राचा संदर्भ मानवी जीवनासाठी कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे ? इकॉनॉमिक्स आणि इकॉनोमी यांच्यातील सूक्ष्म भेदाचे विवरण सांगताना श्री अंकुश देशमुख पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत रुपया हा कशा पद्धतीने महत्त्वाचा असतो,रुपयाचे अवमूल्यन व महत्त्व, परकीय चलन, मुक्त व्यापार करार, सेवा व औद्योगिक क्षेत्रांचा विकास,आयात- निर्यात,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी,जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना याचा अभ्यास करताना आपण आयात व निर्यात,आर्थिक सर्वेक्षण यांचे निरीक्षण केले पाहिजे.
कृषी उत्पादनात भारत हा देश कशा पद्धतीने वाटचाल करीत आहे ? या सर्व बाबींचा उहापोह यावेळी प्रमुख वक्त्यांनी केल्याचे आढळते.
यावेळी 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रस्तुत व्याख्यानाचा व मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेतला.
आजच्या या दुसऱ्या मार्गदर्शन कोर्स प्रसंगी रुसाचे समन्वयक तथा अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा वसतीगृह प्रमुख डॉ.अमित पाटील, डॉ.माधव भुसनर, डॉ.रवी बाळसकर,प्रा.विजय साळुंखे,डॉ.राखी घरटे,डॉ.प्रदिप पवार,प्रा.दिलीप तडवी,प्रा.सचिन आवटे,प्रा.हिमांशू गोसावी,प्रा.अमोल अहिरे,डॉ.हर्ष नेतकर यांच्यासह श्री दिलीप शिरसाठ, पराग पाटील, विशाल अहिरे,अतुल राजपूत यांनी देखील विशेष असे सहकार्य केले.
या प्रसंगी करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ.ए बी जैन,डॉ.धीरज वैष्णव यांनी मार्गदर्शन केले.
सदर दुसऱ्या दिवसीय मार्गदर्शन कोर्सचे समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन व आभाराची जवाबदारी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *