५% निधीसह प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेचे धरणगाव न.प.ला निवेदन ▪️मार्च अखेर न.प.कडून निधी देण्याचे आश्वासन; संजय पाटील
![]()
५% निधीसह प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेचे धरणगाव न.प.ला निवेदन
▪️मार्च अखेर न.प.कडून निधी देण्याचे आश्वासन; संजय पाटील
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव : दिव्यांगांसाठी असलेला पाच टक्के निधीचा लाभ त्वरित मिळावा यासह धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णयानुसार घेतलेल्या विविध निर्णयांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राष्ट्रीय अपंग (दिव्यांग) विकास महासंघाकडून नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांना कार्यालयात निवेदन दिले. तसेच दिव्यांगांना घरपट्टी ५०% माफ करण्यात यावी, त्यासोबतच इतर मागण्या करण्यात आल्या. या निवेदनात म्हटले आहे की, विनाअट घरकुल बचत गटांना अर्थसाह्य देण्यात यावे जे दिव्यांग अतिक्रमणामध्ये व्यवसाय करीत असतील त्यांना व्यवसायासाठी पर्याय जागा उपलब्ध करून देण्यात यावी. नगरपालिका मध्ये उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात दिव्यांगांना गाळा देण्यात यावा असेही या निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय अपंग (दिव्यांग) संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्र काबरे, रमेश सपकाळे, राजू चौधरी रमेश चौधरी, गुलाब माळी, प्रमोद सुतारे, दिपक महाजन, गजानन माळी, महेंद्र चौधरी, राजेंद्र फुलपगार, बाबुलाल पटेल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
*चौकट*
▪️येत्या मार्च पर्यंत निधी देण्याचे न.पा. कडून आश्वासन
1️⃣ राष्ट्रीय अपंग (दिव्यांग) विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्याशी विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यात नगरपालिकेकडून दिव्यांग निधी देण्याची मागणी मुख्यत्वे करण्यात आली.
2️⃣ दिव्यांगांचा विविध प्रश्नांवरदेखील सविस्तर चर्चा करून मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्या, अशी अपेक्षादेखील व्यक्त करण्यात आली.
3️⃣ धरणगावचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आश्वासन दिले की, दिव्यांगांना राखीव ५ टक्के निधी मार्च पावेतो देण्यात येईल.
4️⃣ शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी करावी.

