ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान चे दिमाखात उद्घाटन.* *आर एस पी युनिट, एनएसएस छात्र सैनिक आणि आर एस पी बालसैनिक याचा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग.*
![]()
*ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान चे दिमाखात उद्घाटन.*
*आर एस पी युनिट, एनएसएस छात्र सैनिक आणि आर एस पी बालसैनिक याचा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग.*
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2025 चे उद्घाटन टीप टॉप प्लाझा, ठाणे पश्चिम येथे ठाणे पोलीस आयुक्त माननीय डॉ.आशुतोष डुंबरे साहेब यांचा अध्यक्षतेखाली , सह.पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण साहेब व ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त मा.श्री. पंकज शिरसाट साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक श्री.विचारे साहेब यांनी आपल्या सेवेतील २८ वर्ष वाहतूक विभाग व शिक्षण विभागात दिली. याप्रसंगी विचारे साहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना व पालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व व त्याची आवश्यकता का आहे याविषयी विशेष मार्गदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनीही वाहतूक पोलीस आयुक्त श्री पंकज शिरसाट यांचे अभिनंदन करत सांगितले की 35 वा रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन उत्साह पूर्ण वातावरणात व विविध उपक्रमांनी करण्यात आले. व यापुढेही कायम रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करावी असे देखील सांगितले. ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाट यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की वाहतूक नियमांचे जनजागृती करण्यासाठी केवळ रस्ता सुरक्षा अभियान पुरते मर्यादित नसून वर्षभर अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येईल प्रत्येक नागरिकाला वाहतुकीचे नियम कसे आचरणात आणता येतील याविषयी आरएसपी अधिकारी शिक्षक युनिट यांच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयातील एनएसएस छात्र सैनिक, एनसीसी कॅडेट, व आर एस पी चे बालसैनिक यांच्या सहभाग घेऊन जास्तीत जास्त समाज प्रबोधन कसे करता येईल याविषयी नियोजन करण्यात आले आहे असे सांगितले. ठाणे पोलीस आयुक्त मा.डॉ. आशुतोष डोंगरे साहेब व सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण साहेब यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा कार्याचे कौतुक आणि अभिनंदन केले .यावेळी ज्यांनी आरएसपी विषयाबद्दल कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला ओळख करून दिली असे विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय श्री. सुखदेव पाटील साहेब यांनीही माननीय ठाणे शहर आयुक्त यांना आर एस पी युनिट च्या कार्याबद्दल व कर्तव्याबद्दल विशेष माहिती दिली. सांगितले. यावेळी आर एस पी युनिट चे ठाणे पालघर व नाशिक विभागाचे विभागीय समादेशक डॉ. मनिलाल शिंपी, ठाणे विभागीय समादेशक श्री. महादेव क्षीरसागर, कल्याण डोंबिवली जिल्हा समादेशक श्री. अनंत किनगे,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री. जितेंद्र सोनवणे, ठाणे जिल्हा उपसमादेशक श्री.विनोद शेलकर, ठाणे शहर समादेशक श्री. बाळासाहेब साठे, अंबरनाथ समादेशक श्री.दत्तात्रय पाटील व दत्तात्रय पटवर्धन,श्री. ओमप्रकाश धनविजय, प्रा.दयानंद कांबळे,प्रा.विशाल सोनवने, आर एस पी ठाणे जिल्हा मार्गदर्शक डॉ.राज परब,श्री.माणिक पाटील,यांनी विशेष परिश्रम घेतले.एनएसएस कॉर्डिनेटर प्रा.महादेव कांबळे.उपस्थित होते.यावेळी उल्हासनगर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री.विजय पोवार साहेब,भिवंडी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री.ओव्हाळ साहेब, कल्याण डोंबिवली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री.संजय साबळे साहेब,ठाणे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री. भोसले साहेब, rsp समन्वयक पोलीस निरीक्षक श्री.मोहिते साहेब, कोनगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.साहेबराव यादव साहेब,कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेश शिरसाट साहेब, व सचिन सांडभोर साहेब, विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुखदेव पाटील साहेब,श्री.भामरे साहेब, डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पाटील साहेब यांचा मार्गदर्शनाखाली आर एस पी बालसैनिक,एनएसएस स्टुडंट्स यांना 35 रस्ता सुरक्षा अभियान 2025 बाबत माहिती मिळाली, व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा सहकार्याने प्रत्येक विभागात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक नियम जनजागृती व्हावी यासाठी कार्यशाळेचा माध्यमातून, पथनाट्य, हेल्मेट रॅली, आरोग्य शिबीर,अश्या प्रकारे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत,तसेच प्रत्येक झोन मधून परेड( पदकवायत) पथक तयार करून, किमान झोन मधून चार प्लेटून ( पथके) जिल्हा पोलिस परेड ग्राऊंडवर अंतिम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सहभागी पथकांना विशेष सन्मानचिंन्ह व पथकात सहभागी बालसैनिकांना सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात येणार असून, निवड झालेल्या पथकांना आकर्षक पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त श्री.पंकज शिरसाट साहेब यांनी जाहीर केले आहे. व सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधूंनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त उत्कृष्ठ , व नवीन आविष्कार बँड पथक, संचलन परेड प्लॅटून सादर करून 35 वा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले.महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ठाणे जिल्हा आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कार्य,आणि कर्तव्य खूप उल्लेखनीय आहे.अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि समाजामध्ये वाहतुकीचे नियम अमलात आणण्यासाठी व जनमानसात रस्ते वाहतूक सुरक्षा रक्षक म्हणून जनजागृती घडवून आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे प्रशिक्षण शिक्षण विभाग व पोलीस मुख्यालय यांचा माध्यमातून घेण्याची आवश्यकता आहे. सह.पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे अभिनंदन करताना सांगितले.

