अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेचा शतक महोत्सव – आज नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन!
![]()
अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेचा शतक महोत्सव – आज नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन!
अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेने आपल्या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना अत्याधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न आणि सभासद व ग्राहकाभिमुख अद्ययावत मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि ‘दिनदर्शिका 2025’ चे प्रकाशन दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
या विशेष कार्यक्रमाला पू. संत श्री. सखाराम महाराज यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीने महत्त्व आले आहे. अर्बन बँकेच्या सर्व सन्माननीय आजी व माजी संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद, तसेच पिग्मी एजंट यांचे उपस्थिती सुनिश्चित करण्यात आले आहे.
चेअरमन पंकज गोविंद मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित बी. शिंदे, तसेच बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी या कार्यकमाबद्दल अधिक माहिती प्रसिद्धीस दिली. आधुनिक बँकिंगचे अनुभव घेण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सर्वांना या विशेष निमित्तानं आमंत्रण आहे, जेणेकरून आपण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनू या!

