“वेदांत पाटील: भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट म्हणून नियुक्ती!”
![]()
“वेदांत पाटील: भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट म्हणून नियुक्ती!”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेरच्या वामन नगरच्या रहिवाशी वेदांत रविंद्र पाटीलने आपल्या कार्यशक्तीने भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट (क्लास-1) पदावर नियुक्ती मिळवली आहे. सध्या तो केरळच्या कन्नूर (झिमला) येथे प्रशिक्षण घेत आहे.
वेदांत हा मध्यप्रदेशातील ह.मु.इंदौर येथील रविंद्र आधार पाटील आणि सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एस.सी. सोनवणे यांचा नातु आहे. त्याने इंदौर येथे बी टेक आय टी चे शिक्षण घेतले आहे आणि त्याने रिटन एक्झाम, एस एस बी इंटरविव्ह, मेडिकल टेस्ट, तसेच मेरिट कॉन्फरन्स टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
त्याच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा आरोळा होत आहे. वेदांतच्या कर्तुत्वाने युवांना प्रेरणा मिळेल असे मानले जात आहे.

