अमळनेरच्या कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत मिळवले यश!
1 min read

अमळनेरच्या कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत मिळवले यश!

Loading

अमळनेरच्या कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत मिळवले यश!

अमळनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद वतीने आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत अमळनेरच्या कुस्तीपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. निजाम अली हसन अली सैय्यद 92 किलो गटात, योगराज चोधरी 65 किलो माती गटात, प्रतिक पाटील 61 किलो ग्रीक रोमन गटात आणि भावेश कोळी 57 किलो गटात विजयी झाले आहेत. त्यांच्या या यशामुळे सर्वांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळालेली आहे, जी अहिल्यानगर येथे होणार आहे.
अमळनेरमधून अनेक वर्षांनी चार कुस्तीपटूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे तालुका कुस्तीगीर संघाने त्यांचे अभिनंदन केले आहे. मा. मंत्री श्री आ. अनिल भाईदास पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल मंगळ ग्रह संस्थानचे मा. डिगंबर महाले, मार्केट समितीचे सभापती अशोक आधार पाटील, तसेच कुस्तीगीर संघाचे सदस्य श्री बाळु संतोष पाटील, संजय कौतिक पाटील, प्रताप अशोक शिपी, संजय भिला पाटील, शब्बीर पैलवान, रावसाहेब पहेलवान, भरत पवार आणि प्रविण पाटील यांनी अभिनंदन केले.

अमळनेरच्या कुस्ती प्रेमींमध्ये या यशाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे आणि सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *