श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल संपन्न —–!
![]()
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल संपन्न —–!
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची एक दिवसीय बाहेरील पर्यावरण, निसर्गचक्र, आध्यात्मिक, धार्मिक ,सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, तांत्रिक शैक्षणिक सहल मुख्याध्यापक संदीप पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. सदर सहलीचे प्रमुख श्री ए.पी. जाधव सर यांनी शैक्षणिक सहलीचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक सहल शाळेतून पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवड या ठिकाणी नैसर्गिक वातावरणात आदरणीय माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांच्या शबरी फार्म हाऊसला भेट देण्यात आली. सदरचा शबरी फार्म – नवी दिशा हा 15 एकर क्षेत्रात जून 2008 पासून सुरू करून वनशेती उत्तम मानवी पर्याय आणि हवामान बदलास वृक्ष लागवडीस अनन्य महत्व यासाठी विविध झाडांची लागवड करून संगोपन करण्यात आले आहे. शबरी फार्म व राज फार्म, ऑक्सिजन पार्क प्रकल्प पाहण्यात आले. वृक्ष वाचवा, पृथ्वी वाचवा, धन वाचवा हे ब्रीद वाक्य मनाशी ठेवून सण 1982 मध्ये उजाड माळरानावर निसर्गाचा वेध घेऊन ‘ वेद विकासाचा, दिशा परिवर्तनाची’ आधी केले मग सांगितले. ही जनजागृती आदरणीय साहेबराव दादा पाटील आणि जिजामाता कृषीभूषण सौ. पुष्पलता ताई पाटील यांच्या अथक परिश्रमाने ‘निसर्ग हाच परमेश्वर आहे.!’ हे ब्रीद मनाशी बाळगून शबरी फार्म निर्माण केलेला आहे. सदरच्या फार्मला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात एक आगळा आणि वेगळा आनंद निर्माण झाला. नंतर श्री क्षेत्र श्रीराम मंदिर पिंपरखेड तसेच श्री क्षेत्र मारुती मंदिर या ठिकाणी भेट देऊन पारोळा या ठिकाणी श्री झपट भवानी माता मंदिर, भगवानगड या गजानन महाराज संस्थान अंतर्गत अध्यात्मिक स्थळाला भेट देण्यात आली. तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, तसेच विठु माझा लेकुरवाळा आणि भव्य देखावा भव्य महादेवाचा अवतार आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र म्हणून वाचनालय पाहण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय भक्त गिरीधर शेठ शिंपी यांच्या झोळीत बालाजी मंदिर अर्थात बालाजी मंदिरात ला भेट देऊन सदरच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेण्यात आली. आणि त्यानंतर भुईकोट किल्ला पारोळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेऊन त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर न्याहाळण्यात आला. सदरच्या पारोळा गावी 1827 मध्ये फक्त 50 घरे होती. कसबा हरिदास दामोदर यांनी नंतर ही घरे वाढवली. 1857 च्या लढाईत हा किल्ला तुटला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा माहेर असलेला हा परिसर पाहण्यात आला. 1872 मध्ये सदरच्या पारोळा गावाची लोकसंख्या साधारणतः 13000 च्या जवळपास होती. 1864 मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती.
नंतर श्री तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिर उंदीरखेडे या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणच्या परिसराची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आणि तेथून सार्वे तालुका पारोळा या ठिकाणी हायवे महामार्ग लगतच सौर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. सदर शासकीय प्रकल्पाच्या कामाचे युद्ध पातळीवर काम सुरू असून सदस्य प्रकल्पाच्या बाबतीत राहुल पाटील, धीरज पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेण्यात आली. सदरच्या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज भविष्यात शेती उद्योगासाठी कशी उपयोगी पडेल याविषयी माहिती जाणून घेण्यात आली.
तदनंतर श्री क्षेत्र पद्मालय या ठिकाणी एकाच गाभाऱ्यात डावी आणि उजवी सोंड असलेले गणपती या धार्मिक स्थळाला भेट देऊन सदरच्या ठिकाणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. अशा रीतीने एक दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. सदर शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी श्री व्ही. डी. पाटील, डी. एस. माळी, पी.एम. ठाकरे यांनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच सहलीसाठी वंदना जाधव, सौ.भारती चव्हाण, अर्चना महाजन, सुषमा तेले, छाया निकम मॅडम आणि डी. ए. सोनवणे, वाय.जे. पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित रित्या सहलीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सहकार्य केले. तसेच वाहन चालक गोपाल शिंदे, मनोज पाटील यांनी आपल्या अनुभवानुसार विविध मनोरंजनात्मक गाणी वाजवून मार्गक्रमण केले. चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सदरच्या कामकाजासाठी सहकार्य केले.

