राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा पाया-अधिष्ठाता प्रा डॉ.एस एस राजपूत किसान महाविद्यालयात कार्यशाळा
![]()
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा पाया-अधिष्ठाता प्रा डॉ.एस एस राजपूत
किसान महाविद्यालयात कार्यशाळा
पारोळा प्रतिनिधी
21 व्या शतकात दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट, चांगले विचारशील उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती विकसित करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला सखोल पातळीवर स्वारस्य असलेल्या एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांचा अभ्यास करण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असून गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा पाया म्हणून हे धोरण महत्त्वपूर्ण असल्याचे विद्यापीठाचे
अधिष्ठाता डॉ. एस. एस राजपूत
यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि किसान महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतम शिक्षा अभियान भारत सरकार पुरस्कृत विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक यांच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वाय.व्ही.पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जीव विज्ञान प्रशाळा संचालक प्रा. डॉ. भूषण चौधरी, धरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ उदय जगताप, एरंडोल येथील प्रा. डॉ. अरविंद बडगुजर डॉ. डी बी साळुंखे किसान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गुणवंत सोनवणे कार्यशाळा समन्वयक डॉ. माणिक बागले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ. गुणवंत सोनवणे यांनी कार्यशाळा संदर्भात प्रास्ताविक करून विविध विषयावर प्रकाशझोत टाकला यावेळी उद्घाटनिय मनोगतात डॉ. एस.एस.राजपूत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या सध्या स्थितीवर प्रकाश टाकून आधुनिक युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालक व विद्यार्थी यांच्यातील समन्वय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. डॉ भूषण चौधरी यांनी अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केलेल्या मेजर मायनर ओईजीएस आय के एस या विषयासंबंधी उद्देश महत्व गरज आणि मूल्यमापन यावर विचार मंथन केले.
यावेळी प्रा. डॉ. अरविंद बडगुजर यांनी आंतरवासिता कृतीयुक्त व्यवसाय प्रशिक्षण आणि प्रकल्प याबाबत विद्यार्थ्यांची आंतरक्रिया साधक तांत्रिक बाबी आणि विविध पैलू समजावून सांगितले.
प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी मुक्स या आभासी प्रणाली द्वारे कार्यान्वित असलेल्या उजळणी वर्गाच्या संबंधित उपक्रम आणि आधुनिक तज्ञांचा वापर आव्हाने आणि विकासाची संधी यावर मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. वाय.व्ही पाटील यांनी भारतीय सरकारचा उच्च शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ द्वारा आयोजित सदर कार्यशाळा ही विद्यार्थी पालक आणि प्राध्यापक यांना बारकावे समजून घेण्यास मेंलाचा दगड ठरेल असे सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सदर कार्यशाळेचे यशस्वी त्या आयोजन केल्याबद्दल समन्वयक आणि आयोजन समितीचे अभिनंदन केले.
सूत्रसंचालन डॉ माणिक बागले तर आभार डॉ किरण पाटील यांनी व्यक्त केले कार्यशाळेस सर्व विभाग प्रमुख, पालक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समिती प्रमुख सदस्य व प्राध्यापक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

