अमळनेरला जिजाऊ-सावित्री पारायणाची सांगता वसुंधरा लांडगे यांचा गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम
1 min read

अमळनेरला जिजाऊ-सावित्री पारायणाची सांगता वसुंधरा लांडगे यांचा गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम

Loading

अमळनेरला जिजाऊ-सावित्री पारायणाची सांगता
वसुंधरा लांडगे यांचा गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी-येथील अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांनी दि. ३ जानेवारी २०२५ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व दि.१२ जानेवारी २०२५ स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मांसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.३ जानेवारी ते ६ जानेवारी २०२५ असे चार दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्राचे पारायण केले.तसेच दि.७ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ असे सहा दिवस मांसाहेब जिजाऊ यांच्या चरित्राचे पारायण केले.दोन्हीही ग्रंथ जगण्याची नवी उमेद देणारे आहेत.विश्वबंधुत्वाची भावना जागृत करणारे आहेत.असे वसुंधरा लांडगे यांनी सांगितले.पारायणाची सांगता दि.१२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३:००वा. केली.या दहा दिवसांत अनेक शैक्षणिक सामाजिक,, राजकीय, पत्रकारिता, धार्मिक, क्षेत्रातील मान्यवरांनी पारायणास भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *