राजमाता जिजाऊचे महिलांसाठी तर स्वामी विवेकानंद यांचे तरूणासाठी कार्य प्रेरणादायी -मुख्याध्यापक अनिल महाजन  देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन
1 min read

राजमाता जिजाऊचे महिलांसाठी तर स्वामी विवेकानंद यांचे तरूणासाठी कार्य प्रेरणादायी -मुख्याध्यापक अनिल महाजन देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

राजमाता जिजाऊचे महिलांसाठी तर स्वामी विवेकानंद यांचे तरूणासाठी कार्य प्रेरणादायी
-मुख्याध्यापक अनिल महाजन,

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ, एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व ज्यांनी भारतीय स्त्रियांवर मोठा संस्कार केला. त्यांच्या कार्यामुळे महिलांना शक्ती, साहस, आणि आत्मसमानाचा अनुभव झाला.
त्यांचे कार्य फक्त त्यांच्या काळातच नव्हे तर आजही महिला सशक्तीकरण, संघर्ष, आणि नेतृत्व यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत राहते. जिजाऊंनी शिवाजी महाराज यांना यशस्वी नेतृत्वासाठी प्रेरित केले, आणि त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण, संस्कार, आणि धाडसाचे महत्त्व शिकवले.
तर भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांचे मनोबल वाढवले आहे आणि आजच्या तरूणांसाठी ते एक अनमोल मार्गदर्शक ठरतात. स्वामी विवेकानंद हे केवळ एक साधक नाहीत, तर त्यांनी जगभरातील लोकांना भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि आचारधर्माची महती सांगितले असे शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले..

 

 

 

 

 

 

विचारपिठावर शिक्षक आय.आर.महाजन, अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, होते.अगोदर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता आठवी मधील अर्पिता बोरसे खुशी पाटील, स्नेहा पाटील, प्रिती पाटील, कृष्णा पाटील तर इयत्ता नववी मधून शुभांगी पाटील,ओम भिल यांनी मनोगत व्यक्त केले. तर जिजाऊ वर गीत कांचन जाधव, निशा जाधव, गिरिजा माळी वैष्णवी श्याम पाटील, वैष्णवी भरत पाटील ,नुतन पाटील यांनी सादर केले..

 

 

 

शिक्षक आय.आर महाजन यांनी सांगितले की
जिजाऊ यांचे कार्य महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी जागरूक करते. त्या काळात जिजाऊंनी भूमिकेतील असमानतेला चिरत करत, आपल्या कुटुंबाची सुरक्षितता आणि समाजातील आदर्श रचले. त्यांची दृश्यता आणि पराकाष्ठा आजच्या काळातील मुलींना आणि महिलांना प्रेरणा देते असे सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख आय.आर.महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *