केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !…  ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा  खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ]
1 min read

केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !… ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ]

Loading

केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !…

३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा

खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ]

यावल प्रातिनिधी –

यावल – दिनांक ७ व ८ जानेवारी २०२५ ह्या दिवशी यावल तालुक्यातील साकळी केंद्रात घेण्यात आलेल्या केंद्रीय क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रिडा स्पर्धेत जि.प. प्राथमिक शाळा थोरगव्हाण येथील विद्यार्थ्यानी तीन ट्रॉफी व सात पदके घेऊन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे व गावाचे नाव रोशन केले.दि. ७ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी धनके साहेब दहिगाव व साकळी केद्राचे केंद्रप्रमुख विजय ठाकूर व किशोर चौधरी व साकळी गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि साकळी केंद्रातील सर्व शिक्षक व विद्यार्थी याच्या समक्ष मशाल घेऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . भूतो न भविष्यती अशा क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या . विशेष म्हणजे केंद्रप्रमुख किशोर चौधरी व शिक्षक समाधान कोळी यांच्या प्रयत्नाने प्रेमकांत फाँऊडेशन ठाणे मार्फत सिद्धार्थ हरेश वोरा यांच्या कडून प्रत्येक शाळेतील तीस विद्यार्थ्याना स्पोर्ट ड्रेस मिळाले. त्यामुळे सर्व विद्यार्थी खुपच खुश होते. क्रिडा स्पर्धा प्रसंगी माजी शिक्षण सभापती रविंद्र भाऊ पाटील यांनी उपस्थिति देऊन विद्यार्थ्याचा उत्साह वाढविला. ह्या क्रिडा स्पर्धेत सांघिक खेळात कबड्डी व लंगडी स्पर्धेत थोरगव्हाण शाळेच्या विद्यार्थीनी प्रथम क्रंमाक मिळवला . रस्सीखेच स्पर्धेत द्वितीय क्रंमाक मिळवला . तसेच वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत मुलीच्या धावणे स्पर्धेत द्वितीय क्रंमाक, गोणपाट शर्यत मध्ये प्रथम क्रंमाक, लिंबू चमचा स्पर्धेमधे प्रथम क्रमांक, तीन पायाची शर्यत स्पर्धामधे मुल व मुलींनी प्रथम क्रंमाक मिळवला. सर्व विद्यार्थ्याना ट्रॉफी – मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले . बक्षीस वाटप प्रसंगी पंचायत समिती चे शापोआ अधीक्षक मगर साहेब केंद्रप्रमुख किशोर चौधरी थोरगव्हाण गावाचे उपसंरपच भारत पाटील शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष समाधान चौधरी, ग्रामस्थ संदिप सोनवणे, जितेंद्र सोनवणे, थोरगव्हान शाळेचे सर्व शिक्षक महेंद्र देवरे ,निलेश पाटील, एकनाथ सावकारे, निलेश धर्मराज पाटील तसेच सर्व केंद्राचे शिक्षक व विद्यार्थी साकळी गावाचे सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. बक्षिस मिळाल्यावर सर्व विद्यार्थ्याचा आनंद गगणात मावेनासा झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *