सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा शीला पाटील पुरस्काराने सन्मानित
![]()
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा शीला पाटील पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सावित्री शक्तीपीठ पुणे ही संस्था समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात, अमळनेरच्या प्रा. शीला शिवाजी पाटील यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.
महिला मंचच्या उद्घाटन समारंभात खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, आणि अमळनेर शहराच्या सीओ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात मंचाच्या अध्यक्ष अपर्णाताई, उपाध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, कांचन शहा, सरोज भांडारकर, पद्मजा पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते.
या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे सन्मानपत्र आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याची प्रतिकृती. प्रा. शीला पाटील यांची कार्याची ओळख खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त
वसुंधरा लांडगे यांनी उपस्थितांना करून दिली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या महिला मंचच्या कार्यकारिणीमध्ये प्रा. शीला पाटील सामिल असल्याने त्यांच्या कामामुळे मंचाच्या सर्व सदस्यांना विशेष आनंद झाला आहे.
सावित्रीबाई शक्तीपीठ पुणे व माळी समाज प्रबोधिनीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार, महिलांच्या कार्याची दखल घेतो.
समाजात आपल्या सामाजिक योगदानाची ओळख करून देतो. प्रा. एस. बी. महाजन सर (रावेर) हे समन्वय समितीचे प्रकल्प प्रमुख आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला यश मिळाले आहे.
या कार्यक्रमामुळे महिला सशक्तीकरणास चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे, आणि प्रा. शीला पाटील यांचे कार्य प्रेरणादायी ठरेल. सर्व महिला मंचाच्यावतीने त्यांचे अभिनंदन व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..
कोट
सावित्री शक्तीपीठ पुणे ही संस्था समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान करते. माझ्या सामाजिक कार्याचा कार्याची दखल या संस्थेने घेतली व मला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला हा सन्मान देण्यात आला मी ह्या संस्थेचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करते व या पुरस्काराने मला निश्चित कार्य करण्यास प्रेरणा मिळेल असे प्रा. शीला पाटील यांनी सांगितले..


